ETV Bharat / state

Abu Azami IT Raid : अबू आझमींच्या मालमत्तांवर आयकर विभागाची छापेमारी, अबू आझमी म्हणाले... - 160 कोटींच्या टॅक्स चोरीचा आरोप

Abu Azami IT Raid : समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी सध्या अडचणीत आलेत. आयकर विभागानं त्यांच्याशी संबंधित ठिकाणांवर काल छापेमारी केली. आयकर विभागानं एकाचवेळी तीन शहरात ही छापेमारी केलीय.

Abu Azami IT Raid
Abu Azami IT Raid
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 6, 2023, 12:00 PM IST

मुंबई Abu Azami IT Raid : समाजवादी पक्षाचे नेते तथा आमदार अबू आझमी सध्या चांगलेच अडचणीत आले आहेत. त्यांच्याशी संबंधित मुंबई, वाराणसी आणि लखनऊ येथील मालमत्तांवर आयकर विभागानं काल छापेमारी केली. आमदार अबू आझमींच्या संबंधित मालमत्ता शोधण्यासाठी आयकर विभागानं छापेमारी केल्याची माहिती सुत्रांनी दिलीय. यामुळं राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडालीय. यावर आता अबू आझमींनी ईटीव्ही भारतशी बोलताना महत्त्वपूर्ण खुलासा केलाय.

160 कोटींच्या टॅक्स चोरीचा आरोप : आयकर विभागानं गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये अबू आझमी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या देशभरातील एकूण 30 मालमत्तांवर छापोमारी केली होती. बेनामी संपत्ताच्या खरेदी विक्री प्रकरणात आयकर विभागानं छापेमारी केली हेती. त्यावेळी मुंबई, दिल्ली, वाराणसी, लखनऊ, कानपूर आणि कोलकाता याठिकाणी छापेमारी करण्यात आली होती. तेव्हा अबू आझमींवर 160 कोटींच्या टॅक्स चोरीचा आरोपही करण्यात आला होता. काल या प्रकरणी आयकर विभागानं पुन्हा छापेमारी केली. मात्र यावर अबू आझमींनी ईटीव्ही भारतशी बोलताना वेगळाच खुलासा केलाय.

ईडीनं माझ्या कोणत्याही मालमत्तेवर छापेमारी केली नाही. छापेमारी करण्यात आलेली मालमत्ता माझ्या भागीदाराची आहे. ईडीनं माझ्या मुंबईतील मालमत्तेवर अद्याप कोणतीही छापोमारी केली नाही. ईडीनं केलेल्या छापेमारीशी माझा कोणताही संबंध नाही. - अबू आझमी, नेते समाजवादी पक्ष

कधीपासून सुरू आहे ईडीचा तपास : आयकर विभागानं छापेमारी केलेल्या ठिकाणावरून अनेक महत्त्वाची कागदपत्रं हाती लागली होती. त्याचा मागील 10 महिन्यांपासून तपास सुरू होता. त्यानंतर काल मुंबई, वाराणसी आणि लखनऊमध्ये छापेमारी करण्यात आली होती. याप्रकरणी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार वाराणसीतील विनायक ग्रुपच्या ठिकाणांवरही छापेमारी करण्यात आलीय. हा विनायक ग्रुप समाजवादी पार्टीचे माजी सरचिटणीस गणेश गुप्तांचा असून गणेश गुप्तांचं निधन झालेलं आहे. सध्या हा ग्रुप आता त्यांचे कुटुंबिय चालवत आहेत. या ग्रुपचे वाराणासीत आलिशान मॉल, गगनचुंबी इमारती आणि शॉपिंग कॉम्प्लेक्सही आहेत.

हेही वाचा :

  1. IT Raid on G-Square : मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्या संबंधितांवर छापा टाकण्यास का कचरती आयकर विभाग?
  2. IT Raid Vs IT Survey : आयकर छापा आणि आयकर सर्वेक्षण यात काय फरक आहे? जाणून घ्या
  3. IT Raid On BBC Office : विनाशकाले विपरित बुद्धी; बीबीसी कार्यालयावर छापेमारी प्रकरणी भाजपवर सर्वपक्षीय हल्लाबोल, भाजपचाही पलटवार

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.