मुंबई Abdul Sattars On On Sanjay Shirsat : राज्याचे अल्पसंख्याक मंत्री सत्तार यांनी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड येथे झालेल्या कार्यक्रमांमध्ये जमावावर लाठीचार्ज करण्याचे आदेश दिले. सिल्लोड येथे गौतमी पाटील (Gautami Patil) यांच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते. यावेळेस कार्यक्रमांमध्ये गोंधळ करणाऱ्या जमावाला लाठीने बडवून काढा असे आदेश देतानाच अत्यंत अपशब्द सत्तार यांनी वापरला होता. सत्तार यांच्या या वक्तव्या संदर्भात विरोधी पक्षांसह अनेक स्तरातून टीका सुरू आहे. सत्तार यांच्या या वक्तव्या संदर्भात शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाठ यांनीही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
सत्तार यांनी भान राखून बोलावे : संदर्भात बोलताना संजय शिरसाट म्हणाले की, कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेत्याने बोलताना आणि वागताना जबाबदारीने बोलावे, आपण काय बोलतो आहोत याचं भान बाळगावे. सार्वजनिक कार्यक्रमात अशा पद्धतीने बोलताना कोणाच्याही अपमान होणार नाही. भावना दुखावणार नाही, याची काळजी घ्यावी. सत्तार यांच्या वक्तव्याचं कुणीही समर्थन करणार नाही. सत्तार यांना या संदर्भात मुख्यमंत्री स्वतः योग्य समज देतील, असं शिरसाठ यांनी सांगितलं.
विरोधकांनी केली हुल्लडबाजी : या संदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना मंत्री अब्दुल सत्तार यांनी या घटनेचे खापर विरोधी पक्षावर फोडले आहे. गौतमी पाटील यांच्या कार्यक्रमासाठी 65 हजार लोक जमले होते. यामध्ये वीस हजार महिला होत्या. अशा वेळी कार्यक्रमांमध्ये काही लोक हुल्लडबाजी करण्याचा प्रयत्न करत होते. हे लोक विरोधी पक्षाचे होते आणि ते मुद्दाम कार्यक्रम उधळण्यासाठी अशा पद्धतीची हुल्लडबाजी करत होते. म्हणून अशा लोकांना वठणीवर आणण्यासाठी मी पोलिसांना त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी सांगितलं. वेळी बोलताना मी आमच्या ग्रामीण भाषेत काही बोललो. त्यामुळं जर कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर त्याबद्दल आपण दिलगिरी व्यक्त करतो. यापुढेही सिल्लोड शहरात विविध कार्यक्रम होणार आहेत त्यामध्येही विरोधकांनी जाणीवपूर्वक गोंधळ निर्माण करू नये यासाठी आपण कठोर भूमिका घेतली. मात्र अशा पद्धतीने विरोधकांनी कार्यक्रम उधळून लावण्याचा प्रयत्न केल्यामुळे आपल्याला अशी भूमिका घ्यावी लागली, असा दावा सत्तार यांनी केला आहे.
हेही वाचा -