मुंबई : वादग्रस्त वक्तव्यामुळे कायम चर्चेत राहणारे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांची जीभ आज पुन्हा घसरली, माध्यमांसमोर बोलताना त्यांनी राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (about Supriya Sule) यांच्या बाबत अर्वाच्च भाषा (Abdul Sattar used abusive language) वापरली. त्याचे पडसाद राज्यभर उमटत ( Outrage across the state) आहेत. राष्ट्रवादीच्यावतीने ठिकठिकाणी सत्तारांच्या विरोधात आंदोलन केले जात आहे.
मंत्री अब्दुल सत्तार काय म्हणाले : औरंगाबादमधील सिल्लोड येथे मुख्यमंत्र्यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांची जाहीर सभा होत आहे. या सभेची सर्व तयारी सत्तार बघत आहेत. यावेळी अब्दुल सत्तार यांना खासदार सुप्रिया सुळे यांनी केलेल्या टीकेवर प्रश्न विचारण्यात आला. सुप्रिया सुळेंनी 50 खोके मिळाले का? असा प्रश्न अब्दुल सत्तारांना केला होता. यावर सत्तारांनी तुम्हालाही द्यायचे का, असा प्रतिप्रश्न केला होता. सुप्रिया सुळे यांनी प्रत्युत्तर देत तुमच्याकडे असल्यानेच तुम्ही ऑफर करत असल्याची टीका केली होती. यावर बोलताना सत्तार यांची जीभ घसरली. सुप्रिया सुळे यांचा एकेरी उल्लेख करत 'इतकी भिकारxx झाली असेल तर तिलाही देऊ' असे वादग्रस्त वक्तव्य सत्तार यांनी केले.
राष्ट्रवादी काॅंग्रेस आक्रमक : कृषीमंत्री अब्दुल सत्तार हेआक्षेपार्ह विधानामुळे याआधी अनेकदा चर्चेत आलेले आहेत. आता त्यांनी खासदार सुप्रिया सुळेंवर गलिच्छ भाषेत टीका केली आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. त्यानंंतर राष्ट्रवादी काॅंग्रेस चांगलीच आक्रमक झाली आहे. अब्दुल सत्तारांनी माफी मागावी अन्यथा त्यांना आमच्या भाषेत उत्तर दिले जाईल असा इशारा राष्ट्रवादीकडून देण्यात आला आहे शिवाय त्यांच्या राजीनाम्याचीही मागणी होत असुन त्यांच्याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात येत आहे.
आक्षेपार्ह विधानांची मालिका : वादग्रस्त विधाने करत चर्चेत राहण्यात अब्दुल सत्तार आघाडीवर असतात. शिंदे गटाच्या बंडानंतर त्यांना कृषमंत्री हे चांगले पद मिळाले पण त्या नंतरही त्यांची वादग्रस्त विधानांची मालिका थांबलेली नाही. राज्यात अतीवृष्टीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. अशा शेतीची पाहणी करायला गेल्या नंतर ही त्यांनी दुष्काळ जाहिर करण्या ईतका पाऊस झालेला नाही असे सांगत शेतकऱ्यांना निराष केले होते. तसेच अशाच एका दौऱ्यात जिल्हाधिकाऱ्यांना दारु घेताका असे विचारत त्यांची खिल्ली उडवली होती तेव्हाही त्यांच्यावर टिका झाली.
टीका झाल्यावर झाली उपरली : त्यांनी आपत्तीजनक टिप्पनी केल्यानंतरही त्यांना विचारणा झाल्या नंतरही ते अनेक वेळ वक्तव्यावर ठाम होते. मात्र राज्य भरात त्याचे पडसाद उमटायला लागले. शिंदे गटांच्या मंत्र्यांनी त्या बद्दल नाराजी वक्त केली तेव्हा मात्र सत्तारांनी याबाबत माफी मागितली आहे. माझी महिलांचा अवमान करण्याची इच्छा नाही. मुद्दाम तसे केले नाही. महिलांचा अवमान झाला असेल तर दिलगिरी वक्त करतो असे म्हणत सावरासावर करण्याचा प्रयत्न केला.
राज्यभरात आंदोलन : अब्दुल सत्तार यांच्या वादग्रस्त विधानाचे पडसाद राज्यभर उमटले असून, राष्ट्रवादी काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली आहे. बीड, औरंगाबाद, पुणे, नाशिक अशा विविध जिल्ह्यात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. या विरोधात मंत्री अब्दुल सत्तार यांच्या शासकीय निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसने कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या राजीनामाची मागणी केली आहे. अब्दुल सत्तार याच्या मंत्रायलासमोरील असलेल्या शासकीय निवासस्थानी आंदोलन करण्यात आले. आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या आंदोलन काळात परिसरात तणाव निर्माण झाला होता.