मुंबई - एपीएमसी मार्केट सुरु करा अन्यथा जीवनावश्यक वस्तूंंचा तुटवडा जाणवेल अशी भीती भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी व्यक्त केली आहे. यासंदर्भात शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहले आहे. ट्रान्सपोर्टचे कामगार, माथाडी कामगार कामावर हजर होऊ शकत नसल्याने धान्य, दूध, भाज्या, फळे यासह सिलेंडर वाहतूक करणारी यंत्रणा कोलमडून गेली आहे. एपीएमसी मार्केट तातडीने सुरु करा अन्यथा येणाऱ्या दिवसात शहरात अन्नधान्याचा मोठा तुटवडा जाणून त्यातून नफेखोरीही होण्याची शक्यता आहे, असे पत्र आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिले आहे.
कोरोना व कर्फ्यु च्या पार्श्वभूमीवर नागरिकांकडून येणाऱ्या सुचना व मागण्या शासनाच्या तातडीने लक्षात याव्यात म्हणून
आमदार अँड आशिष शेलार वेळोवेळी पत्र लिहून या बाबी शासनाला कळवित आहेेत. आज मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की,
कर्फ्यु जरी असला तरी जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरु ठेवण्यात आला आहे. मात्र सध्या किराणामालाच्या दुकाना समोर लांबलचक रांगा लावून नागरिक उभे आहेत, असे चित्र सर्वत्र दिसत आहे. तर अनेक किराणामालाच्या दुकानातील उपलब्ध साठा संपल्याने नागरिकांची गैरसोय होते आहे. याबाबत संबंधित युनियन, यंत्रणेतील पदाधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर काही महत्त्वाच्या बाबी समोर आल्या असून त्या शासनाच्या निदर्शनास आणून देत त्यांनी खालील बाबींकडे सरकारचे लक्ष वेधले आहे.
1) किराणामालाची किरकोळ विक्री करणारी दुकाने सुरू असली तरी घाऊक बाजारपेठ बंद असल्याने मालाचा नियमित पुरवठा होत नाही. त्यामुळे छोट्या दुकानातील माल संपत आला आहे तर काही ठिकाणी चढ्या भावाने विक्री होत आहे.
2) महत्त्वाचे असणारे एपीएमसी मार्केट बंद ठेवण्यात आल्याने किराणा माल, धान्य, फळे भाजीपाला याची आवक बंद झाली आहे. त्यामुळे किरकोळ बाजारपेठत नियमित आवश्यक त्या मालाचा पुरवठा होत नाही. त्यामुळे तातडीने एपीएमसी मार्केट सुरु करण्यात यावे.
3) एपीएमसी मार्केट मधे माल घेऊन येणारे ट्रक, त्यांचे ड्रायव्हर, लोडर व संबंधित कामगार कर्फ्यु मुळे कामाच्या स्थळी पोहचू शकत नाहीत. कारण त्यांना जागोजागी पोलिसांकडून अडविले जात आहे. त्यामुळे तातडीने लोडर, माथाडी कामगार, ट्रक ड्रायव्हर, वाहतूकदार यांच्या युनियनची राज्य शासनाने बैठक घेऊन यावर तोडगा काढावा. व तातडीने एपीएमसी मार्केट सुरु करावे.
4) ड्रायव्हर व संबंधित कर्मचारी उपलब्ध नसल्याने शहरांना होणारा दुध आणि दुग्धजन्य पदार्थांचा पुरवठा ही अशाच प्रकारे कमी झाला असून तो नियमित करणे आवश्यक आहे. एकिकडे शहरात आवश्यकतेनुसार दुध उपलब्ध होत नाही तर दुसरीकडे ग्रामीण भागातील दुधाच्या खरेदीत दुध संघांनी घट केली व दर कमी केल्याने दुध उत्पादक अडचणीत आला आहे.
5) भाजीपाल्याची व फळांची आवक ही कमी झाली असून नागरिकांना आवश्यक भाजीपाला उपलब्ध होत नाही तर दुसरीकडे शेतकऱ्यांंचा शेतमाल शेतात पडून राहू लागल्याने शेतकरी अडचणीत आला आहे.
6) महाराष्ट्रात लाँगडाऊन जाहीर करताना शासनाने चिकनची दुकाने खुली राहतील असे जाहीर केले प्रत्यक्षात ही दुकाने बंद आहेत. कुक्कुटपालन करणारे त्यामुळे पुर्णतः उध्वस्त झाले आहेत. ही दुकाने सुरु ठेवण्याबाबत ही योग्यतो विचार शासनाने करावा
7)शासनाने किंमत नियंत्रण करण्यासाठी सर्व सँनिटायझरचा स्टाँक नियंत्रित केला आहे त्यामुळे सध्या मेडिकल दुकांनामधे सँनिटायझर उपलब्ध नाही. तो तातडीने उपलब्ध करुन देण्यात यावा.Body:...Conclusion: