ETV Bharat / state

Pawar On Elections : पंजाबमधील शेतकऱ्यांच्या मनात केंद्र सरकारविषयीचा राग या निवडणुकीतून दिसून आला - शरद पवार - Aam Aadmi Party

दिल्लीतील कामगिरीमुळे (due to performance in Delhi) 'आप'ला पंजाबमधे विजय मिळाला (AAP victory in Punjab) आहे. किसान आंदोलनाचा स्पष्ट परिणाम झालेला येथे पहायला मिळत आहे.त्याच बरोबर सत्ताधारी काॅंग्रेसला पंजाबमधे मोठा धक्का बसला आहे. पंजाब वगळता इतर राज्यात विद्यमान सत्ताधाऱ्यांना कौल मिळाला आहे अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP President Sharad Pawar) यांनी निवडणुक निकालांवर बोलताना दिली आहे.

शरद पवार
author img

By

Published : Mar 10, 2022, 2:24 PM IST

Updated : Mar 11, 2022, 7:36 AM IST

मुंबई: पंजाबातील आम आदमी पक्षाच्या विजयावर प्रतिक्रिया देताना शरद पवार म्हणाले, पंजाबमधील शेतकऱ्यांच्या मनातील राग या निवडणुकीत दिसून आला आणि त्यामुळे तेथील लोकांनी भाजप, काँग्रेसचा पराभव करून नव्या पक्षाला संधी देण्याचा निर्णय घेतला. पंजाब विधानसभा निवडणुकीच्या सुरुवातीच्या कलांपासूनच आम आदमी पक्षानं (Aam Aadmi Party) मुसंडी मारल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे पंजाबमध्ये आम आदमी पक्ष सत्ता स्थापनेच्या जवळ पोचला आहे. आपने सुमारे 90 जागांवर आघाडी मिळवली आहे. तर सत्ताधारी काँग्रेसला पंजाबमध्ये मोठा धक्का बसला आहे. या निकालावर बोलताना राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी म्हणले आहे की, दिल्लीतील कामगिरीमुळे आपचा पंजाबमध्ये विजय मिळाला आहे.

  • Maharashtra | The anger in the minds of the farmers of Punjab was reflected in this election and hence people there defeated BJP, Congress, and decided to give a chance to a new party: NCP chief Sharad Pawar in Mumbai (10.03) pic.twitter.com/m5HyZ2BcWN

    — ANI (@ANI) March 11, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

दिल्लीत आपने दिलेल्या सुविधांमुळेच पंजाबमध्ये आपला स्वीकारले गेले. पंजाब वगळता इतर राज्यात विद्यमान सत्ताधाऱ्यांना कौल मिळाला आहे. पण पंजाबच्या शेतक-यांत केंद्र सरकारविषयी राग होता. पंजाब मधला बदल भाजपला अनुकूल नाही. तसेच तो काँग्रेसला झटका देणारा आहे. काँग्रेसची स्थिती पंजबामध्ये चांगली होती. मात्र जे बदल झाले ते जनतेने नाकारले. अमरेंद्रसिंहसारख्या प्रभावशाली नेत्याला दूर करणे काँग्रेसची चूक होती. दिल्लीत जे आंदोलन झाले त्यात पंजाबचा फार मोठा सहभाग होता. म्हणून लोकांनी भाजप काँग्रेसला नाकारत 'आप'ला सत्ता दिली.

Last Updated : Mar 11, 2022, 7:36 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.