मुंबई : अवघ्या महाराष्ट्र राज्याच्या 12 कोटी ही जनतेचे लक्ष असलेल्या मुंबई मेट्रोच्या संदर्भातील दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरूवारी यांनी केले. मुंबई उपनगर अंधेरीच्या लोकल स्टेशनच्या पूर्वेला दोन किलोमीटर अंतरावर म्हणजेच पश्चिम द्रुतगती मार्गाच्या समांतर या ठिकाणी गुंदवली मेट्रो रेल्वे स्थानक आहे. काल त्याचे पंतप्रधान उद्घाटन केले. परंतु या ठिकाणी महत्त्वाची नोंद घेण्याजोगी बाब अशी की, शासकीय कार्यक्रमाचे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते पार पडले. मात्र भारतीय जनता पक्षाचे झेंडे या ठिकाणी लावलेले दिसत होते.
दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन : शिंदे फडणवीस शासनाने सत्तांतर झाल्यावर जलद गतीने निर्णय घेतले. हजारो कोटी रुपये खर्च करून एमएमआरडीएने अर्थात मुंबई विकास महानगर प्राधिकरण यांनी मुंबईतील मेट्रोचे जाळे विणण्याचे ठरवले. अखेरीस मेट्रो दोन आणि मेट्रो सात यांच्या दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काल गुंदवली रेल्वे स्थानकात सायंकाळी साडेसहा वाजता पार पडले.
भाजपचे चिन्ह असलेले झेंडे : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारताचे पंतप्रधान आहेत. ते एक शासकीय संवैधानिक पदावर आहेत. त्यामुळे ते हा कार्यक्रम कुठल्याही एका पक्षाचे प्रतिनिधी म्हणून नव्हे, तर आपल्या संसदेचे सर्वात महत्त्वाचे वरिष्ठ नेते आणि देशाचे महत्त्वाचे नेते म्हणून शासकीय कार्यक्रमाचे त्यांनी उद्घाटन केले. मात्र या ठिकाणी गुंदवली रेल्वे स्थानकाच्या खाली भारतीय जनता पक्षाचे चिन्ह असलेले झेंडे लावलेले दिसत होते.
दुतर्फा पक्षाचे झेंडे : रस्त्याच्या दुतर्फा पक्षाचे झेंडे लावणे हे एक वेळ समजू शकतो. मात्र शासकीय कार्यक्रमात शासनाचेच सर्वोच्च पदावरील व्यक्ती हजर आहेत. शासनाच्या कार्यक्रमात झेंडे मात्र भारतीय जनता पक्षाचे होते. हा या ठिकाणी मोठा चर्चेचा विषय ठरलेला आहे. ही विसंगती जाणकार लोकांनी हेरली. मात्र नाव न सांगता हे योग्य नाही, असे उपस्थित लोकांनी ईटीव्ही भारतसोबत संवाद साधताना सांगितले.
जनतेच्या पैशातून उभा राहिलेला प्रकल्प : या संदर्भात आम आदमी पक्षाचे महाराष्ट्राचे नेते धनंजय शिंदे यांच्यासोबत ईटीव्ही भारत वतीने संवाद साधला असता त्यांनी सांगितले की, एक तर पंतप्रधान हे देशाचे आहे ते कुठल्या पक्षाचे नाहीत. त्यामुळे ते ज्या कार्यक्रमाचे उद्घाटन करीत आहे, तो जनतेच्या पैशातून निधीतून उभा राहिलेला प्रकल्प आहे. या प्रकल्पासंदर्भात आमचे म्हणणे वेगळे आहे. परंतु एका शासकीय कार्यक्रमाच्या ठिकाणी पक्षाचे झेंडे असणार हे सर्वतः चुकीची बाब आहे. आपण भारताच्या इतिहासातील उदाहरण जर पाहिले तर शिशुपाल याने जसे 100 वध केले होते. त्यांचे गुन्हे वाढत गेले. तसेच भारतीय जनता पक्षाचे गुन्हे करण्याची संख्या वाढत चालली आहे. 2024 च्या निवडणुकीमध्ये त्यांना धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही.