ETV Bharat / state

आज...आत्ता...बाळासाहेबांचे संस्कार जीवंत असल्याने उद्धव यांनी राज ठाकरेंची बाजू घेतली - सुप्रिया सुळे - todays important news

झरझर नजर...दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी वाचा फक्त एका क्लिकवर...

आज...आत्ता...औरंगाबाद स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत शिवसनेचे अंबादास दानवे विजयी
author img

By

Published : Aug 22, 2019, 9:39 AM IST

Updated : Aug 22, 2019, 3:24 PM IST

  • २.२४ PM - खुनाच्या प्रकरणात आरोपी न दाखवण्यासाठी कर्नाटकातील पोलीस अधिकाऱ्याने लाच मागितल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात सोलापुरात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
  • २.२२ PM - नागपुरात खामला परिसरात एक किलोमीटर अंतरावरचे चार एटीएम चोरट्यांनी फोडण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. यामध्ये एसबीआय, आयसीआयसीआय, बँक ऑफ इंडीया, आयडीबीआय बँकेचा समावेश आहे.
  • २.११ PM - फडणवीस सरकारला आत्तापर्यंत केलेल्या सर्व घोटाळ्यांचा हिशोब द्यावा लागेल. त्यांना त्यांच्या जनादेश यात्रेत जनतेने याबद्दल जाब विचारायला हवा, असे अमोल कोल्हे परभणीमध्ये बोलताना म्हणाले.
  • १.५५ PM - राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी नौपाडा पोलीस ठाण्यामध्ये मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव आणि कार्यकर्त्यांची भेट घेतली.
  • १.५१ PM - अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर नगरपरिषदेत 14 कोटींचा घोटाळा झाल्याचे समोर आले आहे. त्यावरून तत्कालीन नगराध्यक्षांसह 6 अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
  • १.४१ PM - अहमदनगर जिल्ह्यातील खांडके गावातील लक्ष्मण गाडे शेतकऱ्याने आत्महत्या केल्यामुळे शेतकरी आक्रमक झाले आहेत. त्यांनी अहमदनगर -पाथर्डी महामार्गावर रास्ता रोको करत हलगर्जी पणा करणाऱ्या आधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली.
  • १.३५ PM - नाशिक-मखमलाबाद रोड भागात गुरुवारी पहाटेच्या सुमारास एटीम फोडून तब्बल 31 लाख रुपये चोरट्यानी लंपास केले.
  • १.३२ PM - आमचे सरकार निवडून द्या. आम्ही 3 महिन्यात सातबारा कोरा करू, सर्व रिक्त पदे भरू आणि स्थानिकांना खासगी व्यवसायात 75 टक्के आरक्षण देणारा कायदा करू, असे आश्वासन अजित पवार यांनी जळगावात राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिवस्वराज्य यात्रेत दिले.
  • १.२६ PM - राज ठाकरे आणि पी चिदंबरम यांची चौकशी प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यासारखी आहे. याविरोधात सर्वसामान्यांनी आवाज उठवायला हवा. देशात सर्वांच्याच बाबतीत असेच घडत आहे, असे उर्मिला मातोंडकर नागपुरात म्हणाल्या.
  • १२.५७ PM - ईडीची चौकशी म्हणजे राजकीय दबाव तंत्र आहे. अशावेळी परिवारच मागे उभा राहतो. त्यामुळे परिवार राज ठाकरे यांच्यासोबत गेला, तर कोणी टीका करू नये. तसेच बाळासाहेबांचे संस्कार अजूनही जीवंत आहेत. यामुळेच उद्धव ठाकरेंनी भाऊ राज ठाकरेंची बाजू घेतली असल्याचे खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या.
  • १२.४५ PM - ठाण्यात मनसे पदाधिकाऱ्यांनी 'मी आहे राज भक्त' अशी टी-शर्ट घालून तसेच राज ठाकरे यांचे मुखवटे लावत स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन केले.
  • १२.३७ PM - अंजली दमानियाला कुटुंब वात्सल्य, कौटुंबीक नाती-प्रेम हे कळणार नाही, असे म्हणत मनसेचे उपाध्यक्ष यशवंत किल्लेदार यांनी दमानिया यांच्या टीकेला ट्विटद्वारे प्रत्युत्तर दिले.
  • १२.२५ PM - ठाण्यातील मॅक डॉनल्ड येथे चोरी करून पळणाऱ्या चोराना नागरिकांनी पकडताच त्यानो कोयत्याने स्वतःला जखमी केले. त्यानंतर नागरिकांवर देखील हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, नागरिकांनी त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यानंतर त्याला सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले.
  • १२.१० PM - मनसे ठाणे उपशहर अध्यक्ष सुशांत सुर्यराव, कळवा, मुंब्रा विधानसभा विभाग अध्यक्ष महेश साळवी, संजोग शिळकर, जनहित कक्षाचे राज्य चिटणीस मोहनसिंह चौहान, विध्यार्थी सेना उपशहर अध्यक्ष दिपक शिंदे आदींसह अनेक मनसे कार्यकर्त्यांना कळवा पोलिसांना ताब्यात घेतले आहे.
  • १२.०० PM - अहमदनगर जिल्ह्यातील खांडके गावात शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. लक्ष्मण संपत गाडे, असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.
  • ११.३२ AM - एका रात्रभरात नागपूर शहरात तिघांची हत्या झाल्याच्या वेगवेळ्या घटना घडल्या आहेत. दोघांची हत्या नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत झाली आहे, तर तिसरी हत्या सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीत झाली आहे.
  • ११.२४ AM - राज ठाकरे ईडी कार्यालयामध्ये दाखल झाले आहेत.
  • १०.५७ AM - कळवा येथील लेव्हल क्रॉसिंग गेट जास्त काळ सुरू ठेवल्याने मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे. ठाण्याकडे येणाऱ्या आणि जाणाऱ्या दोन्ही धीम्या मार्गावरील गाड्या बंद आहेत.
  • १०.४२ AM - राज ठाकरे ईडी कार्यालयाकडे रवाना. त्यांच्यासोबत पत्नी शर्मिला ठाकरे, मुलगा अमित ठाकरे देखील दुसऱ्या गाडीने रवाना झाले आहेत.
  • १०.४० AM - बाळा नांदगावकर कृष्णकुंजवर हजर झाले आहेत.
  • १०.३६ AM - मनसे ठाणे शहर उपाध्यक्ष विश्वजित जाधव यांना देखील राबोडी पोलिसांनी ताब्यात घेतले.
  • १०.११ AM - काळ्या रंगाचचे टिशर्ट घालून सरकारचा निषेध केल्यामुळे मनसे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांना नौपाडा पोलिसांनी ताब्यात घेतले. तसेच मनसे वाहतूक सेनेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष आशिष डोके यांना ठाणे नगर पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यासोबतच मनसे ठाणे शहर सचिव रवींद्र सोनार, मनसे प्रभाग अध्यक्ष विनायक रणपिसे यांना ताब्यात घेतले आहे.
  • ९.३६ AM - मनसे कार्यकर्त्यांची आक्रमकत पाहून दादर परिसरात जमावबंदी लागू करण्याचे आदेश देण्यात आले आहे.
  • ९.३४ AM - चर्मकार समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी रविदास महाराज यांचे दिल्लीतील तुघलकाबाद येथील मंदिर प्रशासनाने अकारण पाडले आहे. या घटनेच्या निषेधार्थ जळगाव जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलने करण्यात आली. तसेच चाळीसगावात चर्मकार उठाव संघाने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पुतळ्याचे दहन केले.
  • ९.३२ AM - औरंगाबाद स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेचे अंबादास दानवे विजयी झाले आहे. एकूण 657 पैकी 647 मतदारांनी बजावला होता मतदान हक्क.
  • ८.०७ AM - नागपुरात एका रात्री वेगवेगळ्या भागात 2 हत्येच्या घटना घडल्या आहेत. नंदनवन परिसरात गुंडाने भाजी विक्रेता मोहम्मद, इम्रान मोहम्मद रियाज ची हत्या केली, तर सदर परिसरात व्यावसायिक ऋषी खोसलाची हत्या हत्या करण्यात आली आहे.
  • ७.५२ AM - मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांना शिवाजी पार्क पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
  • ७.३४ AM - राज ठाकरे गुरुवारी सकाळी ११ वाजता ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर राहणार आहेत. ईडी कार्यालय आणि दक्षिण मुंबईकडे येणारे रस्ते तसेच संभाव्य आंदोलनाच्या ठिकाणी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आले आहे. डॉ. आंबेडकर रोड आणि पूर्वमुक्त मार्ग एक्झिटला नाकाबंदी करण्यात आली आहे.

Intro:Body:

[8/22, 9:17 AM] Amit Futane Aurangabad: औरंगाबाद - स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक, शिवसेनेचे अंबादास दानवे विजयी, 647 पैकी 524 मत मिळवून मिळवला विजय, 15 मत झाली बाद.

--------------

[8/22, 9:22 AM] Prashant Bhadane, Jalgaon: Jalgaon

संत रविदास महाराजांचे मंदिर तोडल्याच्या निषेधार्थ जाळला अरविंद केजरीवालांचा पुतळा; जळगाव जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलन

जळगाव

चर्मकार समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी रविदास महाराज यांचे दिल्लीतील तुघलकाबाद येथील मंदिर प्रशासनाने अकारण पाडले आहे. त्यामुळे देशभरातील चर्मकार समाज बांधवांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या असून संतापाची लाट उसळली आहे. या घटनेच्या निषेधार्थ जळगाव जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलने करण्यात आली. जळगावात चर्मकार महासंघाने निषेध मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले तर चाळीसगावात चर्मकार उठाव संघाने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पुतळ्याचे दहन करत निषेध नोंदवला. धरणगाव, पाचोरा, एरंडोल शहरात देखील या घटनेच्या निषेधार्थ आंदोनले झाली.

Conclusion:
Last Updated : Aug 22, 2019, 3:24 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.