ETV Bharat / state

आज.. आत्ता..Live Blog : आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा पाकिस्तानला दणका, कुलभूषण जाधव निर्दोष - news bulletin

झरझर नजर... दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वाचा एका क्लिकवर..

सकाळी
author img

By

Published : Jul 17, 2019, 7:45 AM IST

Updated : Jul 17, 2019, 7:25 PM IST

  • 7.00 PM - आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा पाकिस्तानला दणका, कुलभूषण यांच्या फाशीला स्थगिती दिल्याने मुंबईत नागरिकांचा जल्लोष
  • 5.10 PM औरंगाबादमध्ये विवाह नोंदणीसाठी आलेल्या जोडप्यास मारहाणीचा प्रयत्न. प्रेम बंधनात अडकलेले जोडपे नोंदणी पद्धतीने विवाह करण्यासाठी आल्यानंतर त्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न झाल्याची घटना घडली.
  • 4.20 PM - पुण्याच्या उंद्री परिसरातून 91 लाखाचे कोकेन जप्त, दोघांना अटक, अंमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई.
  • 4.01 PM - मुंबईतील धोकादायक इमारतींचा क्लस्टर पद्धतीने पुनर्विकासासाठी कायदा करणार - मुख्यमंत्री
  • 3.30 PM नाशिक - बंदुक दाखवून खंडणीची मागणी करणाऱ्या दोघांना अटक. पोलिसांनी आरोपींची धिंड काढली.
  • 3.20 PM रत्नागिरी - रिफायनरी आंदोलन पुन्हा तापले. आम्हाला परवानगी नाकारली आणि समर्थकांच्या मोर्चाला परवानगी मिळाली तर आम्हीही आंदोलन करणार भूमिकन्या एकता मंचचा इशारा
  • 3.04 PM कोल्हापूर - पावनखिंडीत दारू पिणाऱ्या मद्यपींना शिवराष्ट्रचा दणका, पावनखिंडीमध्ये दारू पीत बसलेल्या वीस ते पंचवीस मद्यपींना शिवराष्ट्र संस्थेच्या कार्यकर्त्यांनी चोपले.
  • दुपारी 2.15 - जम्मू काश्मीरमध्ये चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा
  • श्रीनगर - जम्मू काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यातील सोपोरी भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक चालू होती. या चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला आहे. त्याच्याकडून शस्त्रे आणि दारुगोळा ताब्यात घेण्यात आला आहे.
  • दुपारी 2.03 - शास्त्रींव्यतिरिक्त टीम इंडियाला 'हे' दोन प्रशिक्षक लाभण्याची शक्यता!
  • मुंबई - विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धा झाल्यानंतर टीम इंडियाच्या गोटात बदलाचे वारे वाहत आहेत. बीसीसीआयने भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य आणि सहाय्यक प्रशिक्षकपदासाठी नवीन अर्ज मागवले आहेत. मात्र, ही नेमणूक बीसीसीआयने घातलेल्या अटींवर होणार आहे. या प्रशिक्षकपदाच्या शर्यतीमध्ये रवी शास्त्रींव्यतिरिक्त गॅरी कर्स्टन, टॉम मुडी, यांची नावे असण्याची शक्यता आहे. सविस्तर वाचा
  • दुपारी 12.10 - विमा कंपन्यांवरील शिवसेनेच्या मोर्चाला सुरुवात
  • मुंबई - शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. विमा कंपन्यांविरोधात शिवसेनेचा आज मुंबईत मोर्चा निघाला आहे. 'भारती एक्सा' या कंपनीच्या कार्यालयावर हा मोर्चा धडकणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या मोर्च्याचे नेतृत्व करत आहेत. सविस्तर वाचा
  • 10.40 - विश्वासदर्शक ठरावात बंडखोर आमदारांची उपस्थिती बंधनकारक करता येणार नाही - सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
  • नवी दिल्ली - कर्नाटकातील बंडखोर आमदारांच्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय दिला. 'कर्नाटक विधानसभा अध्यक्ष रमेश कुमार यांना आमदारांच्या राजीनाम्यांवर तातडीने किंवा विशिष्ट कालावधीत निर्णय देण्याची सक्ती करता येणार नाही,' असा निकाल न्यायालयाने दिला. त्याचबरोबर, विश्वासदर्शक ठरावावेळी उपस्थित राहणे बंडखोर आमदारांना बंधनकारक करता येणार नाही, असेही न्यायालयाने म्हटले आहे. या निर्णयामुळे कुमारस्वामींचे सरकार धोक्यात आले आहे. वाचा सविस्तर
  • 10.01 - कुलभूषण जाधव खटला प्रकरण : पाकिस्तानचे अटॉर्नी जनरल यांच्या नेतृत्त्वाखालील पथक आंतरराष्ट्रीय न्यायालय हेग येथे दाखल झाले आहे. या पथकामध्ये पाकिस्तानचे परराष्ट्र प्रवक्ते डॉ. मोहम्मद फैसाल यांचाही समावेश आहे.
  • सकाळी 10.09 - बंडखोर आमदारांच्या राजीनामा याचिकेवर आज 'सर्वोच्च निर्णय'
  • नवी दिल्ली - कर्नाटकातील सत्ताधारी पक्षाच्या बंडखोर आमदारांच्या राजीनाम्यावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पूर्ण झाली. विधानसभा अध्यक्ष रमेश कुमार यांनी हे राजीनामे स्वीकारावेत की नाही, याविषयी आज निर्णय होण्याची शक्यता आहे. राज्य विधानसभेच्या सदस्यत्वाचे दिलेले राजीनामे स्वीकारण्याचे आदेश कर्नाटक विधानसभेचे अध्यक्ष के. आर. रमेशकुमार यांना द्यावेत, अशी मागणी काँग्रेस-जेडीएसच्या १५ बंडखोर आमदारांनी केली होती. अधिक वाचा
  • सकाळी 9.55 - मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत; विठ्ठलवाडी स्थानकादरम्यान तुटली ओव्हरहेड वायर
  • मुंबई - मध्य रेल्वेवरील विठ्ठलवाडी स्थानकाजवळ आज (बुधवारी) सकाळी ओव्हरहेड वायर तुटल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली. ऐन गर्दीच्या वेळी खोळंबा झाल्याने प्रवाशांमधून संताप व्यक्त केला जात आहे. वाचा सविस्तर
  • सकाळी 9.05 - जम्मू काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यातील सोपोरी भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सरू
  • सकाळी 7.30 - दिल्लीमध्ये आज सकाळीपासूनच मुसळधार पाऊस
  • सकाळी 7.10 - डोंगरी दुर्घटना : मृतांचा आकडा 13 वर, 9 जखमी; बचावकार्य सुरूच
  • मुंबई - दक्षिण मुंबईतील डोंगरी परिसरात केसरबाई नावाची तळमजला अधिक चार मजली असलेली अवैध इमारत कोसळून मंगळवारी दहा जणांचा मृत्यू झाला होता. आज या दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला असून एकूण मृतांचा आकडा १३ वर पोहचला आहे. तर ९ रहिवासी जखमी झाले आहेत. एनडीआरएफ, मुंबई अग्निशमन दल आणि पोलिसांच्या मदतीने अद्यापही घटनास्थळी ढिगारा उपसण्याचे काम सुरू आहे. ढिगार्‍याखाली 40 हून अधिक लोक अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. अधिक वाचा
  • सकाळी 7.05 - मालाड भिंत दुर्घटनेतील मृतांचा आकडा 30 वर, उपचारादरम्यान एकाचा मृत्यू
  • मुंबई - पश्चिम उपनगरातील मालाड पिंपरी पाडा येथील पालिकेच्या जलाशयाची संरक्षक भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मृतांचा आकडा 30 वर गेला आहे. या घटनेत जखमी झालेल्या 23 वर्षीय युवकावर मुंबईतील नायर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, मंगळवारी त्याचा मृत्यू झाला. 2 जुलै रोजी मुसळधार पाऊस सुरू असताना ही दुर्घटना घडली होती. अधिक वाचा
  • सकाळी 6.45 - कुलभूषण जाधव यांची सुटका होणार? आज आंतरराष्ट्रीय न्यायालय देणार निकाल
  • हेग - भारतीय नौसेनेचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव प्रकरणी संयुक्त राष्ट्रांचे हेग येथील आंतरराष्ट्रीय न्यायालय (ICJ) आज निकाल देणार आहे. न्यायालयाच्या निकालानंतर कुलभूषण जाधव हे पाकिस्तानच्या तुरुंगात राहणार की नाही हे स्पष्ट होईल. सविस्तर वाचा

Intro:Body:Conclusion:
Last Updated : Jul 17, 2019, 7:25 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.