- 10.20 PM - जम्मू काश्मीरला भूकंपाचा धक्का; ३.६ रिश्टर स्केलवर नोंद
- 10.00 PM - बोरीवली येथील नदीत आढळला मृतदेह
- 9.30 PM - पुणे - चिखलीत पोलीस चौकीसमोरच दोन गटात तुफान राडा; पोलिसांनाही धक्काबुक्की
- 8.40 PM - कोपरीच्या मीठागारात बुडून दोघांचा मृत्यू
- 8.12 PM - अहमदाबादमध्ये आकाश पाळणा तुटून झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू
- 07.20 PM- CWC FINAL ENGvsNZ LIVE : पहिल्या विश्वविजेतेपदासाठी इंग्लंडसमोर २४२ धावांचे आव्हान
- 07.15PM - ठाणे :नराधम मामाचा 6 वर्षीय चिमुरड्या भाचीवर अमानुष अत्याचार; नराधम गजाआड
- 07.10 PM - नांदेड : दुचाकीस्वाराला वाचविण्याच्या प्रयत्नात पिकअप व्हॅनचा अपघात; २३ वारकरी जखमी, पाच जणांची प्रकृती गंभीर.
- 07.00PM नागपूर गेल्या अनेक दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने पुन्हा हजेरी लावल्यामुळे शेतकरी सुखावला
- 06.50PM - महाजनांकडून भाजपला विठ्ठलाची उपमा, म्हणाले आषाढीला वारकऱ्यांचे डोळे जसे विठुरायाकडे लागतात, तसे आता सगळ्यांचे लक्ष भाजपकडे लागले आहे.
- 06.45 PM - फक्त दहावी पास असला तरी मिळणार महावितरणमध्ये नोकरी, 'या' पदासाठी आहेत ५ हजार जागा
- 06.40 PM - देशात एकमेव टीव्ही उत्पादन कारखाना पुण्यात, कंपनीने आयात करातून वगळण्याची केली मागणी
-
०६ .३० PM - करतारपूर कॉरिडोर बैठक : भारताच्या अनेक मागण्या पाकला मान्य
-
06.10PM - कुमारस्वामींनी विश्वासदर्शक ठराव सिद्ध करून दाखवावा अथवा द्यावा राजीनामा - येडियुरप्पा
-
06.00 PM - व्हिडिओ : बिहारात पुराचा नवविवाहिताला फटका, नववधूची पाठवणी एका ड्रमच्या होडीतून
-
05.45 PM - हिंगोलीत शेतीच्या वादातून वडिलांचा मुलासह पत्नीवर प्राणघातक हल्ला
-
05.30 PM कॅटरिनाने शेअर केलेल्या फोटोची अर्जुनने उडवली खिल्ली, कॅटने दिले 'हे' उत्तर
- ०५.२० PM - अमरावतीच्या चिखलदरा पर्यटन क्षेत्र येथे तलावात दोघे बुडाले, पर्यटक नागपूर शहरातील
- ०५.१५ PM - हिमाचलप्रदेशमधील सोलन येथे इमारत कोसळली,३५ जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती
-
०५.०० PM राज्यातील विधानसभा निवडणुका ऑक्टोबरमध्ये, तर सप्टेंबरमध्ये लागू होणार आचारसंहिता - गिरीश महाजन
- ०४.४५ - मराठवाड्यात पीक स्थिती गंभीर.. पिकांना जीवदान देण्यासाठी २२ जुलैनंतर बरसणार कृत्रिम पाऊस, जयदत्त क्षीरसागर यांची माहिती
-
04.35PM- विश्वकरंडकातील अंतिम सामन्यावेळीही बलुची संघटनांकडून पाकिस्तानचा निषेध
-
04.10Pm - काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे मुख्यमंत्री झाले तर आनंद होईल - भाजप खासदार
- 3.50 PM- ठाण्याच्या कोपरी परिसरतील मिठागर खाडीत शनिवारी दुपारी बुडालेल्या दोन तरुण मुलांचे मृतदेह सापडले
- 03.15 PM - IPLची संघ संख्या १० होणार, दोन नव्या संघांसाठी टाटा, अदानी, गोयंका शर्यतीत
- 03. 05 PM - पुणे-नाशिक महामार्गावर कळंब येथे दोन वँगनर कारचा अपघात,वीकेंडला नाणेघाटात निघालेल्या सहा मुलींच्या कारला अपघात; सहा मुली गंभीर जखमी
----------
दुपारी 2.47 - विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना थोड्याच वेळात सुरू होणार आहे. न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. यजमान इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात रंगणार सामना
दुपारी 12.18 - नवज्योत सिंग सिद्धू यांनी दिला मंत्रिपदाचा राजीनामा.. ट्विटरवर राहुल गांधींना राजीनामा लिहून पाठवलेल्या पत्राचा फोटो शेअर केला.. राजीनामा पत्रावर १० जून तारीख दिसत आहे.
सकाळी 10.20 - मुंबई - पीक विमा कंपन्याविरुद्धचा मोर्चा म्हणजे शिवसेनेची निव्वळ नौटंकी; विजय वडेट्टीवार
सकाळी 9.40 वाशिम - मेडशी येथील अज्ञात चोरट्याने फोडली डिसीसी बँक; शनिवारी मध्यरात्रीची घटना.
सकाळी 9.25 अमरावती - पथ्रोट गावात शिरलेल्या हरणाचा दुर्दैवी मृत्यू, पाण्याच्या शोधात गावात शिरल्याचा अंदाज
सकाळी 9.15 पुणे - पिंपरी-चिंचवडमध्ये तब्बल एक क्विंटल गांजा जप्त, भोसरी पोलिसांची कारवाई
सकाळी 9.10 अहमदनगर - निर्भयाच्या मारेकऱ्यांना फाशी केंव्हा..श्रध्दाच्या आईचा सरकारला सवाल., शनिवारी घटनेला ३ वर्ष पूर्ण
सकाळी 8.55 - औरंगाबादमध्ये आणखी एक एटीएम फोडण्याचा प्रयत्न
औरंगाबाद - शहरात आणखी एक एटीएम फोडण्याचा प्रयत्न करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. शहरातील पडेगाव परिसरात असलेले एसबीआय बँकेचे एटीएम चोरट्यांनी गॅस कटरने एटीएम कापून रक्कम चोरण्याचा धाडसी प्रयत्न केला. मात्र, सुदैवाने चोरट्यांना एटीएम तोडता न आल्याने रक्कम सुरक्षित राहिली. याप्रकारामुळे औरंगाबाद शहरातील एटीएमची सुरक्षा धोक्यात आली आहे. औरंगाबाद शहरात सलग दुसऱ्या दिवशी घडली एटीएम लुटीची घटना अधिक वाचा
सकाळी 8.50 आसाममध्ये पूर : काझीरंगा राष्ट्रीय उद्यानातील बहुतांश प्राण्यांना सुरक्षित स्थळी हलवले
बाक्सा - आसाममध्ये भयंकर पूरस्थिती आहे. याचा फटका माणसांसह प्राण्यांनाही बसत आहे. काझीरंगा राष्ट्रीय उद्यानातील ७० टक्के प्राण्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. यातील ९५ कॅम्पस पाण्याखाली गेले आहेत. याचे गांभीर्य लक्षात घेऊन उद्यान प्रशासनातील बहुतेक वन अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यांना कामावर हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. अधिक वाचा
सकाळी 8.00 उस्मानाबाद - झाड पाल्यातून विषबाधा झाल्याने सुमारे ७८ मेंढ्यांचा मृत्यू; तेर जवळील हिंगळजवाडीतील घटना
सकाळी 7.45 कणकवली - कलमठ ते खारेपाटण या टप्प्यातील चौपदरीकरणाचे काम करणाऱ्या केसीसी बिल्डकाँनच्या कर्मचाऱ्यांना मारहाण प्रकरणी तक्रार दाखल.
सकाळी 7.30 पुणे - मोबाईल चोरी करणारी परराज्यातील टोळी हिंजवडी पोलिसांनी केली जेरबंद; २ लाखांचे २२ मोबाईल जप्त
सकाळी 7.15 अमरावती - दर्यापूर तालुक्यातील पुर्णा नदीवरील धरणात बुडून विद्यार्थ्याचा मृत्यू
सकाळी 7.12 - सांगली : कृष्णेच्या पात्रातील मगरीचा मृत्यू, 12 फुटी अजस्त्र मगर सापडली मृतावस्थेत,मृत मासे खाल्याने मृत्यू झाल्याची माहिती