- 10.10 PM मुंबई - मुंबईतील डोंगरी भागात इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेतील जीवितहानीबद्दल राज्यपाल विद्यासागर राव दुःख व्यक्त केले.
- 9.36 PM कोल्हापूर - एसटी बसमध्ये चढण्यास प्रतिबंध केल्याच्या रागातून कोल्हापूर-सोनुर्ले बसच्या वाहकास तीन तरुणांनी केली बेदम मारहाण
- 9.20 PM भंडारा - जिल्हाधिकारी शांतनू गोयल यांचे पुणे महानगरपालिकेत स्थानांतरण. तर, भंडाऱ्याचे नवे जिल्हाधिकारी म्हणून डॉ.एन. बी.गीते हे रुजू होणार. गीते हे नाशिक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी होते.
- 9.16 PM - मुंबई - रेल्वे ट्रक ओलांडताना महिलेचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू, कल्याण ते मुंबईच्या दिशेने जाणारी जलद रेल्वे लोकलखाली झाला अपघात
- 8.19 PM मुंबई - डोंगरी दुर्घटनेतील मृतांची संख्या १० वर; बचावकार्य अद्याप सुरू
- 7.45 PM रत्नागिरी - परशुराम घाटात दरड कोसळणे सुरूच; दिवसभरात दोन वेळा कोसळली दरड
- 7.24 PM मुंबई - डोंगरी इमारत दुर्घटना, इमारतीच्या ढिगाऱ्यातून आणखीन 2 जणांना बाहेर काढण्यात आले
- 6.55 PM - डोंगरी दुर्घटनेतील मृतांचा आकडा ८ वर; जे.जे. रुग्णालयात जखमींवर उपचार सुरू
- 6.15 PM - रायगड - मुंबई-पुणे जुन्या महामार्गावर एसटी बसला अपघात, दोन जखमी. मुंबई-पुणे या जुन्या महामार्गावर खालापूर जवळील माधवबाग येथे एसटी बस चालकाचे नियंत्रण सुटून बस दुभाजकाला व कंटेनरला धडक देऊन अपघात झाला.
- 5.27 PM मुंबई - डोंगरी दुर्घटनेत ५ वा मृत्यू; जावेद इस्माईल, असे मृताचे नाव. जे.जे रुग्णालयात 6 जणांवर उपचार सुरू
- 4.57 PM - केडीएमसीचे शिवसेनेचे माजी नगरसेवक व कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मयूर पाटील यांच्यावर होणार आर्म अॅक्ट खाली गुन्हा दाखल. वाढदिवसानिमित्त सोमवारी रात्री उशिरा केक कापताना तलवार काढून दाखवल्याने प्रकरण अंगाशी, तलवार काढून केक कापतानाचे फोटो व व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल. कल्याण तालुका पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे यांनी गुन्हा दाखल करण्याचे दिले संकेत.
- 4.30 PM - मुंबईत ४ मजली इमारती कोसळली; इमारतीच्या ढिगाऱ्याखाली ३० ते ४० जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. यापैकी ४ जणांचे मृतदेह मिळाले आहे.
- दुपारी 4.01 PM मुंबई - काँग्रेस नेते मिलींद देवरा घटनास्थळी दाखल
- दुपारी 3.43 PM मुंबई - उद्योगमंत्री सुभाष देशमुख घटनास्थळी दाखल
- दुपारी 3.00 PM - इमारतीत 30 ते 40 अडकल्याची भीती
- दुपारी 12.15 - मुंबईत ४ मजली इमारतीचा भाग कोसळला; अनेकजण अडकल्याची भीती
- मुंबई - डोंगरीतील सारंगभाई कौसरभाई या चार मजली इमारतीचा अर्धा भाग कोसळला आहे. या दुर्घटनेत ४० ते ५० जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. पोलीस आणि अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून बचाव कार्य चालू आहे.
- सकाळी 10.20 - पँथरचा झंझावात पडद्याआड; राजा ढाले यांचे निधन
- मुंबई - राज्यातील जातीयवादी शक्तीविरोधात तीव्र लढा देणारे दलित पँथरचे संस्थापक, आंबेडकरी चळवळीचे नेते, ज्येष्ठ विचारवंत नेते राजा ढाले यांचे सोमवारी सकाळी विक्रोळी येथील निवासस्थानी निधन झाले. त्यांच्या निधनाने एका पँथर पर्वाचा अस्त झाल्याची भावना व्यक्त होत आहे. सविस्तर वाचा
- सकाळी 9.59 - नो-पार्किंग प्रकरणी मुंबईत महापौरांवर दंडात्मक कारवाई
- मुंबई - मुंबईकरांवर पार्किंगसाठी दंड लावला जात असताना मुंबईच्या महापौरांनी 'नो पार्किंग'मध्ये आपले वाहन उभे केल्याचे उघड झाले होते. याप्रकरणी, टिकेची झोड उठल्यानंतर वाहतूक पोलिसांनी महापौरांकडून दंड वसुलीसाठी ई-चलन पाठवले असल्याचे सांगण्यात येत आहे. अधिक वाचा
- सकाळी 9.40 - देवाचे घरही सुरक्षित नाही; पिंपरी-चिंचवडमध्ये चोरट्यांचा मंदिरावर डल्ला
- पुणे- पिंपरी-चिंचवड शहरात चोरीचे प्रमाण वाढले असून आता देव घरही सुरक्षित नसल्याचे एका चोरीच्या घटनेतून समोर आले आहे. शहरातील पिंपरी येथील शीतला देवी मंदिरात अज्ञात दोन चोरांनी दानपेटी आणि देवीचा चांदीचा मुकुट लपास केला आहे. याप्रकरणी रोहन नंदकुमार हराळे यांनी पिंपरी पोलिसात फिर्याद दिली आहे. अधिक वाचा
- सकाळी 9.10 - पाकिस्तान झुकला...! हवाई हद्द भारतीय विमानांसाठी केली खुली
- इस्लामाबाद - पाकिस्तानने नागरी विमानांसाठी बंद केलेली हवाई हद्द आज (मंगळवार) पासून भारतासाठी खुली केली आहे. भारताने फेब्रुवारी महिन्यात बालाकोटमधील दहशतवादी तळांवर केलेल्या हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तानने त्यांची पूर्वेकडील हवाई हद्द भारतीय विमानांसाठी बंद केली होती. आता त्यावरील निर्बंध उठविण्यात आले आहेत. अधिक वाचा
- सकाळी 8.20 - ISSF JUNIOR WC : भारताची सुवर्णकन्या इलावेनिलचा विश्वविक्रम!
- सुहल - इंटरनॅशनल शुटिंग स्पोर्ट फेडरेशन (ISSF) च्या ज्युनिअर विश्वकरंडक स्पर्धेत भारताच्या इलावेनिल वालारिवानने सुवर्णपदक पटकावले. आपलीच साथीदार मेहुली घोष हिला 1.4 अशा गुणांनी हरवले आणि एक विश्वविक्रम प्रस्थापित केला. अधिक वाचा
आज...आत्ता Live Blog : डोंगरी दुर्घटनेतील मृतांची संख्या १० वर; बचावकार्य सुरू - live news
झरझर नजर... दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर
मुंबई

Intro:Body:
Conclusion:
पँथरचा झंझावात पडद्याआड; राजा ढाले यांचे निधन
Conclusion:
Last Updated : Jul 16, 2019, 10:19 PM IST