ETV Bharat / state

Aaditya Thackeray : विरोधकांनाही हेवा वाटावा, असा वरळीचा विकास, आदित्य ठाकरेंचे वरळीकरांना पत्र - emotional letter to Worlikar

माजी मंत्री आदित्य ठाकरे ( Aaditya Thackeray ) यांनी वरळीकरांना पत्र लिहिले आहे. विरोधकांना हेवा वाटावा, असा वरळीचा विकास झाला असल्याचे त्यांनी म्हटले आहे. यापूर्वी जूनमध्ये गलिच्छ राजकारण आणि गद्दारी करुन लोकहिताचा विचार करणारे सरकार पाडले, असे म्हणत त्यांनी नाव न घेता विरोधकांवर निशाणा साधला आहे.

Etv Bharat
Etv Bharat
author img

By

Published : Nov 21, 2022, 10:35 PM IST

मुंबई - राज्यात गेल्या तीन महिन्यांपूर्वी झालेल्या राजकीय नाट्यमय घडामोडीनंतर सत्तांतर झाले. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वरळी विधानसभा मतदार संघ ताब्यात घेण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. माजी मंत्री आणि वरळी मतदार संघाचे विद्यमान आमदार आदित्य ठाकरेंनी मतदार संघातील जनतेला भावनिक पत्र ( Aaditya Thackeray letter to Worlikar ) लिहून विरोधकांवर टीकास्त्र सोडले आहे.

Aaditya Thackeray letter to Worlikar
आदित्य ठाकरेंचे वरळीकरांना पत्र

आदित्य ठाकरे यांची पत्राद्वारे नाव न घेता टीका - मुंबई मनपा ताब्यात घेण्याचा चंग भाजपने बांधला आहे. दहीहंडी, गणेशोत्सव, दिवाळीमध्ये विविध उपक्रम हाती घेण्यात आले. भाजपचा वरळी विधानसभा मतदार संघ ताब्यात घेण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. त्यावरुन राजकारण रंगले असतानाच, आता राज्याचे माजी पर्यावरणमंत्री आणि वरळी मतदार संघाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी वरळीकरांना पत्र पाठवले आहे. यातून भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या गटाचा उल्लेख न करता त्यांच्यावर टीका केली आहे.

विरोधकांना हेवा वाटावा, असा वरळीचा विकास - आमदार आदित्य ठाकरे ( MLA Aaditya Thackeray ) यांच्या आमदारकीला तीन वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने आदित्य ठाकरे यांनी वरळीकरांना हे पत्र लिहिले आहे. हे पत्र ठाकरे गटाचे पदाधिकारी, कार्यकर्ते घरोघरी जाऊन पोहोचवत आहेत. मी वरळी ए प्लसचे वचन दिले होते आणि यामुळे अनेक कामे केली आहेत. अशा प्रकारची कामे केल्यानंतर विरोधकांना सुद्धा हेवा वाटावा, असा विकास वरळीचा झाल्याचे त्यांनी पत्रकात म्हटले आहे. तसेच राजकीय दृष्ट्या प्रत्येक पक्षाला वरळीत वेळ आणि पैसा खर्च करायचा असल्याचे इथे लावलेल्या बॅनरवरुन दिसत असल्याचे त्यांनी पत्रातून म्हटले आहे.

काय आहे पत्रात - महाराष्ट्र विधानसभेमध्ये तुमचा प्रतिनिधी म्हणून माझी निवड होऊन तीन वर्षे झाली आहेत. या तीन वर्षात आपल्या प्रेमाने मला आशीर्वादित केले आहेत. आणि मी प्रार्थना करतो की हेच प्रेम आणि तुमचे आशीर्वाद कायम माझ्यासोबत राहोत. माझ्या निवडणुकीपूर्वी मी तुम्हाला वरळी A+चे वचन दिले होते. गेल्या तीन वर्षात वरळीला प्रगती आणि समृद्धीच्या मार्गावर नेण्यासाठी आपण सर्व एकसंघ म्हणून काम करत आहोत. नवीन बस थांबे असोत, चांगले फुटपाथ, मजबूत रस्ते असोत, हिरवीगार मोकळ्या जागा असो किंवा सामुदायिक स्तरावर आणि वैयक्तिक स्तरावर लसीकरण ड्राईव्ह आणि इतर समस्येचे निराकरण असो, आपण वरळीकरांच्या सहकार्याने करत आलो आहोत.

गद्दारी करून लोकहिताचे सरकार पाडले - राजकीयदृष्ट्या प्रत्येक पक्षाला देखील वरळीत वेळ आणि पैसा खर्च करायचा असतो. आपल्या वरळीवर त्यांचे लक्ष, त्यांनी वरळीत लावलेले बेकायदेशीर बॅनर आणि त्यावर होणारा खर्च यामुळे मला खात्री पटते की वरळी हेवा वाटावा, अशी प्रगती करत आहे. त्यांना देखील वरळीत यावेसे वाटतेय. यापूर्वी जूनमध्ये गलिच्छ राजकारण आणि गद्दारी करुन लोकहिताचा विचार करणारे सरकार पाडले गेले. पण आम्हाला नि:स्वार्थपणे काम करण्यापासून आणि आपली सेवा करण्यापासून कोणीही रोखू शकणार नाहीत. आम्ही तुमचा आशीर्वाद आणि प्रेमासाठी काम करतच राहू आणि हेच आम्हाला पुढे ऊर्जा देत राहिल, असे पत्राचा समारोप करताना आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.