ETV Bharat / state

Aaditya Thackeray Allegation : खते खरेदी करण्यासाठी विचारली जात; आदित्य ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, आम्ही जातीचे..

author img

By

Published : Mar 10, 2023, 3:36 PM IST

देशात यापूर्वी अशी स्थिती कितीही नव्हती शिवसेनेने कधीही जातीपातीचे राजकारण केले नाही, असे माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले. सांगली जिल्ह्यात शेतकऱ्यांना खते खरेदीसाठी जात विचारण्यात आल्याच्या घटनेवरून त्यांनी केंद्रासह राज्य सरकारवर टीका केली आहे.

Aaditya Thackeray Critics
आदित्य ठाकरे
आदित्य ठाकरे माध्यमांसोबत संवाद साधताना

मुंबई : देशातील काही भागात शेतकऱ्यांना खते खरेदीसाठी जात विचारण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. विरोधकांनी यावरून शिंदे फडणवीस सरकारला लक्ष केले. देशात यापूर्वी अशी स्थिती कितीही नव्हती शिवसेनेने कधीही जातीपातीचे राजकारण केले नाही. शिंदे - फडणवीस सरकारने आता वाद किती निर्माण करायचा, याबाबत सरकारने भूमिका ठरवायला हवी, अशी टीका माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी केली आहे.

जातीपातीचे राजकारण केले नाही : सांगली जिल्ह्यात शेतकऱ्यांना खत खरेदीसाठी जात विचारण्यात आली आहे. हा प्रकार चव्हाट्यावर आल्यानंतर विरोधकांनी सरकारला धारेवर धरले. विधिमंडळात याचे पडसाद उमटले. युवासेना प्रमुख आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी याबाबत प्रतिक्रिया देताना, देशात आणखीन किती वाद निर्माण करायचे हे सरकारने आता ठरवण्याची गरज आहे. शिवसेनेने कधीही जातीपातीच राजकारण केलेले नाही. मात्र केंद्र सरकारला कदाचित जातीपातीचा डेटा केंद्र गोळा करायचा असेल, त्यामुळे सक्ती केली जात असावी. मात्र, ज्यांना आपली जात हिंदुस्तानी लिहायचे असेल तर तसे नमूद करू शकतात असेही आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

ही निवडणूक शेवटची : आज ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांचे निकटवर्तीय आणि रामदास कदम यांचे बंधू सदानंद कदम यांना ईडीने ताब्यात घेतले. आदित्य ठाकरे यांनी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. देशभरातील विरोधकांवर किंवा जे सरकार विरोधात भूमिका मांडतात. त्यांच्यावरती कारवाई करण्याचा प्रकार होत आहेत. कोणीही त्याला घाबरण्याची गरज नाही. उलट सरकारच आम्हाला घाबरले आहे. आता इन्साफ के शिपाई म्हणून आम्ही लढत आहोत. देशभरात हे प्रकार सुरू झाल्याने देशातील राजकीय स्वातंत्र्य आणि लोकशाही जिवंत आहे का, असा प्रश्न आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला. तसेच 2024 ची देशातील निवडणूक शेवटची ठरेल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.

राज्य सरकारवर टीका : देशात विरोधकांवर कारवाईची टांगती तलवार आहे. जे भाजपला जाऊन मिळालेत त्यांच्या फाईल बंद करण्यात आल्या आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मागील आठवड्यात देशभरातील विरोधकांना साद घालून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले. आमच्या लोकांवर खोटी, तडीपारची नोटीस आणि खोटे बोलणे दाखल करण्याचा सपाटा केंद्र आणि राज्य सरकारने सुरू केला आहे. मात्र, अशा प्रकारची कोणतेही राज्य सरकार चालू शकत नाही, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

हेही वाचा : Opponents Aggressive Over Lodha Statement : लव्ह जिहादवरील लोढांच्या विधानावर विरोधक आक्रमक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.