मुंबई Aaditya Thackeray : शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी आज (शनिवार, 6 जानेवारी) मुंबईत बोलताना राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. "हे सरकार महाराष्ट्रविरोधी आहे", असं ते म्हणाले.
हे सरकार महाराष्ट्रविरोधी आहे : "ही मुंबई आमची आहे. या मुंबईनं देश चालवला. हे सरकार महाराष्ट्रविरोधी आहे. तुम्ही राज्यात एक तरी नवीन उद्योग आणला आहे का? जनतेच्या भविष्यासाठी कोण लढतोय याकडे लक्ष द्या. इथे नवा रस्ताही बनवला आहे का? आमचं सरकार सत्तेवर येताच ज्यानं घोटाळा केला तो तुरुंगात जाईल, असं आदित्य ठाकरे म्हणाले.
आमच्या हृदयात राम आहे : आदित्य ठाकरे यांनी पुढे बोलताना हिंदुत्वाच्या मुद्यावरून भारतीय जनता पक्ष आणि शिंदे गटावर हल्लाबोल केला. आमचं हिंदुत्व स्पष्ट आहे. आमच्या हृदयात राम आहे. हे हिंदुत्व पुढे नेण्याचं काम आमच्या हातात आहे, असं आदित्य ठाकरे म्हणाले.
श्रीकांत शिंदेंनी घेतलं रामलल्लाचं दर्शन : दुसरीकडे, शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी अयोध्येत रामलल्लाचं दर्शन घेतलं. यावेळी बोलताना, राम मंदिरासाठी पंतप्रधान मोदींनी संघर्ष केल्याचं ते म्हणाले. "मी रामलल्लाचं दर्शन घेतलं. राम मंदिराचं बांधकामही पाहिलं. प्रत्येकाचं स्वप्न पूर्ण होत आहे. 22 जानेवारीला हे स्वप्न पूर्ण होणार आहे. तो प्रत्येकासाठी भावनिक क्षण असेल. जेव्हाही आम्ही अयोध्येत आलो तेव्हा आम्हाला झोपडीत रामाचं दर्शन घ्याव लागायचं. परंतु 22 जानेवारीपासून आम्ही रामाचं दर्शन भव्य मंदिरात घेऊ, असं श्रीकांत शिंदे म्हणाले.
हे वाचलंत का :