मुंबई - मंत्रालयात आत्महत्येचा प्रयत्न करण्यात आला आहे ( Suicide attempt in Mantralaya ) बीड जिल्ह्यातील आष्टी येथील बापू नारायण मोकाशी या तरुणाने मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरून उडी ( A youth attempted suicide in Mantralaya in Mumba ) मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र, सुरक्षततेसाठी लावण्यात आलेल्या जाळी मुळे सदर तरुणाचा जीव वाचला.पुढील तपास पोलीस करीत आहे.
प्रेयसीवर अतिप्रसंग - मंत्रालयात आज एका तरुणाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आत्महत्या करणारा तरुण हा बीड आष्टी येथील असून तीन वर्षांपूर्वी त्याच्या प्रेयसीवर अतिप्रसंग ( Girlfriend rape ) झाला असून याबाबत त्याला न्याय मिळत नसल्याने त्यांनीही कृत्य केलं असल्याच्या माहिती समोर येत आहे. मंत्रालयात आत्महत्येचा प्रयत्न करणारा तरुणाचे नाव बापू मोकाशी असा असून त्याचं वय 43 वर्ष एवढे आहे. आपल्या प्रियसी वर अतिप्रसंग करणाऱ्या आरोपीला अटक व्हावी आपल्याला नाही मिळावा यासाठी तात्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आपण चार पत्र लिहिली होती. तरीही अद्याप आपल्याला न्याय मिळाला नाही. यासाठी आपण आत्महत्येचा प्रयत्न करत असल्याचं त्या तरुणाने सांगितला आहे.
न्याय मिळत नसल्याने मारली उडी - बापू मोकाशी या तरुणाने मंत्रालयाच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारली मात्र मंत्रालयाच्या दुसऱ्या मजल्यावर लावलेल्या जाळीत हा तरुण अडकला त्यामुळे या तरुणाला गंभीर इजा झाली नाही मात्र उडी मारल्यानंतर या तरुणाच्या डोक्याला किरकोळ जखम झाली आहे उडी मारल्यानंतर लगेचच मंत्रालयात तैनात असलेल्या पोलिसांनी या तरुणाला ताब्यात घेतलं त्यानंतर उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल आहे. आज मंत्रालयात राज्य मंत्रिमंडळाची बैठक होती त्यामुळे मंत्रालयात मोठी वर्दळ होती राज्यभरातून नागरिक मंत्रालयात आज उपस्थित होते अशातच या तरुणांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्यामुळे तेथे धावपळीचे वातावरण निर्माण झालं. या तरुणाने आत्महत्याचा प्रयत्न केला त्यावेळेस राज्य मंत्रिमंडळाची बैठक देखील सुरू होती.