ETV Bharat / state

Registration of Third Gender : तृतीयपंथी मतदार नोंदणीसाठी विशेष शिबिर

author img

By

Published : Mar 31, 2022, 2:15 PM IST

आंतरराष्ट्रीय तृतीयपंथी ओळख दिन (International Third Gender Day) म्हणून ३१ मार्च हा दिवस जगभर साजरा केला जातो. त्या निमित्ताने दि. २७ मार्च ते १० एप्रिल २०२२ दरम्यान तृतीय पंथीयांच्या मतदार नोंदणीसाठी विशेष शिबिराचे (A special camp for third gender voter registration) आयोजन करण्यात आले आहे. मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी तसे निर्देश दिले आहेत.

Registration of Third Gender
तृतीयपंथी मतदार नोंदणी

मुंबई: सर्व मतदार नोंदणी अधिकाऱ्यांनी जास्तीत जास्त तृतीयपंथीयांची नावे मतदार यादीत समाविष्ट करावीत, अशा सूचना मुंबई शहर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांनी दिल्या आहेत. तृतीयपंथीयांच्या मतदार नोंदणीच्या विशेष कार्यक्रमासाठी १७९ सायन कोळीवाडा विधानसभा मतदार संघातर्फे सामाजिक न्याय विभाग, महिला व बालविकास मुंबई, कौशल्य विभाग यांच्या सहकार्याने वडाळा येथील मुंबई जिल्हा एड्स नियंत्रण सोसायटी येथे आज आंतरराष्ट्रीय तृतीयपंथी ओळख दिनाच्या निमित्ताने तृतीय पंथीयांसाठी मतदार नोंदणीच्या विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते.

शिबिरास तृतीयपंथी मतदारांनी विशेष प्रतिसाद दिला. सामाजिक न्याय विभागातर्फे तृतीयपंथी मतदारांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती देण्यात आली.मुंबई शहर जिल्ह्यात विविध विधानसभा मतदारसंघातील तृतीयपंथी मतदारांना मतदार ओळखपत्र वाटप करण्यात आले. तसेच त्यांच्याकडून नवीन नाव नोंदणीचे अर्ज व नावात दुरुस्ती करण्यासाठी अर्ज स्विकारण्यात आले. १८१ माहिम विधानसभा मतदारसंघात आंतरराष्ट्रीय तृतीयपंथी ओळख दिनानिमित्त घरोघरी जाऊन निवडणूक मतदार ओळखपत्र वाटप करण्यात आले व नवीन नाव नोंदणीचे अर्ज स्विकारण्यात आले. या विशेष शिबिराच्या अनुषंगाने जास्तीत जास्त तृतीयपंथी नागरिकांनी मतदार म्हणून नाव नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी निवतकर यांनी केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.