ETV Bharat / state

पवई पोलिसातील एका शिपाईला भाजप कार्यकर्त्यांकडून बेदम मारहाण - Police constable beaten news powai

पवई पोलिसातील एका शिपाईला भाजपच्या कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण केली. नितीन खैरमोडे, असे मारहाण झालेल्या पोलीस शिपाईचे नाव आहे.

Police constable beaten Powai
पोलीस शिपाई मारहाण
author img

By

Published : Jan 11, 2021, 10:59 PM IST

मुंबई - पवई पोलिसातील एका शिपाईला भाजपच्या कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण केली. नितीन खैरमोडे, असे मारहाण झालेल्या पोलीस शिपाईचे नाव आहे.

पवई हिरानंदानी येथे गॅलरीया मॉल जवळ एक जेष्ठ महिला डॉक्टरच्या वाहनाल भाजप कार्यकर्त्यांची दुचाकी धडकली. भाजप कार्यकर्ते दुचाकीवर ट्रिपल सीट प्रवास करत होते. या वेळी घटनास्थळी पवई पोलीस दाखल झाले व त्यांनी आरोपी सचिन तिवारी, दिपू तिवारी आणि आयुष राजभरला ताब्यात घेतले. मात्र, तिघांना रिक्षाने नेत असताना तिघाही भाजप कार्यकर्त्यांनी शिपाई नितीन खैरमोडे यांना मारहाण केली.

कार्यकर्त्यांनी हातातील कड्याने खैरमोडे यांच्या तोंडावर आणि गालावर मारले. या वेळी नितीन यांच्या तोंडातून रक्त येऊ लागले आणि तेव्हाच या तिघांनी रिक्षातून पळ काढला. मात्र, मागून येणाऱ्या पोलिसांनी सचिनला पकडले, मात्र दिपू आणि आयुष फरार झाले. सध्या पवई पोलीस या दोघांचा शोध घेत आहे. हे तिघेही भाजपचे कार्यकर्ते असून घाटकोपर आणि विक्रोळी परिसरात कार्यरत आहेत. पोलिसांनी त्यांच्यावर सरकारी कामात अडथळा, सरकारी कर्मचाऱ्याला मारहाण, असे गुन्हे दाखल केले असून पुढील कारवाई सुरू आहे.

हेही वाचा - उद्धव ठाकरेंनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती दिली - किरीट सोमैया

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.