ETV Bharat / state

Amruta Fadnavis Blackmail Case: अमृता फडणवीसांना अडकवण्यासाठी बाप-लेकीने रचला होता नियोजित कट-पोलिसांचा दावा - Devendra And Amruta Fadnavis

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांना ब्लॅकमेल करणारे आरोपी अनिल जयसिंघानी आणि त्याची मुलगी अनिक्षाबाबत पोलीसांनी मोठा खुलासा केला आहे. अमृता फडणवीस यांना कुठला मेसेज पाठवायचा याबाबत बाप-लेकीमध्ये आधी चर्चा व्हायची असे पोलीसांच्या तपासात समोर आले आहे.

Amruta Fadnavis Blackmail Case
अमृता फडणवीसांना अडकवण्यासाठी कट
author img

By

Published : Mar 24, 2023, 10:56 AM IST

मुंबई : अमृता फडणवीस यांच्या मोबाईलवर कुठलाही व्हॉट्सअप मेसेज पाठवण्याआधी अनिक्षा तिच्या वडिलांशी चर्चा करायची. तपासावेळी पोलीसांना एक मोबाईल आणि त्यातील मेसेजचे स्क्रीनशॉट्स सापडले आहेत.जे अमृता फडणवीस यांना पाठवले जाणार होते. या बाप लेकींमध्ये सारखी चर्चा व्हायची. त्यामुळे बाप-लेक मिळून अमृता फडणवीसांना फसवण्याचा कट रचत होते, असा पोलिसांना संशय आहे.

व्यवसायाबाबत खोटी माहिती दिली: काही वर्षांपूर्वी अनिक्षा अमृता फडणवीसांना एक फॅशन डिझाईनर म्हणून भेटली होती. परंतु ती फॅशन डिझाईनर नसून कायद्याचा अभ्यास करणारी विद्यार्थिनी असल्याचे तपासात समजले आहे. अनिक्षा जयसिंघानीने या संपूर्ण प्रकरणात आतापर्यंत केवळ दोन जणांची नावे घेतली आहे. मात्र ती पोलीसांची दिशाभूल करत असल्याचा संशय अधिकाऱ्यांना आहे. सहानुभूती मिळवण्यासाठी अनिक्षाने तिच्या व्यवसायाबाबत खोटी माहिती दिली, अशी शक्यता असल्याचे पोलीसांनी म्हटले आहे.

बाप-लेकीविरोधात कट रचला: पोलीसांनी अनिक्षाच्या घरी धाड टाकली. घरातून डिझाईनर कपडे आणि विविध सामान जप्त केले. हे कपडे आणि साहित्य तिने कुणाकडून घेतले याचा शोधचा प्रयत्न केला जात आहे. अनिक्षाचे नातेवाईक निर्मल जयसिंघानी देखील या प्रकरणात आरोपी आहेत. त्यांचे रेडिमेड कपड्यांचे शोरूम आहे. पण ते डिझाईनर कपडे विकत नाहीत. तसेच अमृता फडणवीस यांच्या तक्रारीनंतर पोलीसांनी २० मार्चला बाप-लेकीविरोधात कट रचून बळजबरीने ब्लॅकमेलिंग आणि लाच ऑफर केल्याचा गुन्हा नोंदवला आहे.

खंडणीची मागणी केली होती: अनिक्षा जयसिंघानीने अमृता फडणवीस यांच्याशी ओळख करून विविध प्रकरणात अडकवण्यासाठी फोन केला होता. तसेच फोनवरून विविध प्रकारचे व्हाट्सअप चॅट व व्हिडिओ पाठवले होते. त्यानंतर खंडणीची मागणी केली होती. अशी प्रकरची तक्रार अमृता फडणवीस यांनी हिल पोलीस ठाण्यात केली होती. या तक्रारीनंतर अनिक्षा जयसिंघानीला मुंबई पोलीसांनी तुरुंगात रवानगी केली आहे.

हेही वाचा: Amruta Fadnavis Blackmail Case अमृता फडणवीस खंडणी प्रकरण अटकेविरोधात अनिक्षा अनिल जयसिंघानींची न्यायालयात धाव

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.