ETV Bharat / state

रेल्वेच्या प्रवाशांना मिळणार विमानतळासारखा अनुभव, मुंबई सेंट्रल स्थानकात उभारणार आधुनिक प्रतीक्षालय

author img

By

Published : Mar 23, 2021, 10:28 PM IST

विमानतळाच्या धर्तीवर रेल्वे प्रवाशांना दर्जेदार आणि उत्तम सुविधा देण्यासाठी गेल्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे अत्याधुनिक प्रतीक्षालय सुरू करण्यात आले होते. आता त्याच्या पाठोपाठ पश्चिम रेल्वेकडून मुंबई सेंट्रल स्थानकात आधुनिक प्रतीक्षालय उभारणार आहे. त्यातून पश्चिम रेल्वेला लाख रुपयांचा महसूल मिळणार आहे.

Mumbai Central Station
मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानक

मुंबई - विमानतळाच्या धर्तीवर रेल्वे प्रवाशांना दर्जेदार आणि उत्तम सुविधा देण्यासाठी गेल्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे अत्याधुनिक प्रतीक्षालय सुरू करण्यात आले होते. आता त्याच्या पाठोपाठ पश्चिम रेल्वेकडून मुंबई सेंट्रल स्थानकात आधुनिक प्रतीक्षालय उभारणार आहे. त्यातून पश्चिम रेल्वेला लाख रुपयांचा महसूल मिळणार आहे.

Mumbai Central Station
प्रतीक्षालयाचा आराखडा

62 लाख 45 हजार रुपयांचा येणार खर्च

पश्चिम रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार मेल एक्सप्रेसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना उत्तम सुविधा मिळाव्या यासाठी पश्चिम रेल्वे मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकात अत्याधुनिक प्रतीक्षालय सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी पश्‍चिम रेल्वेने एका खासगी कंपनीशी करार केला असून हा करार पाच वर्षांचा आहे. त्यामाध्यमातून पश्चिम रेल्वेला प्रतिवर्षी 18 लाख 89 हजार 240 रुपये तर 5 वर्षांत 1 कोटी 43 हजार 822 रुपयांचे उत्पन्न मिळणार आहे. हे आधुनिक प्रतीक्षालयाला बाधण्यासाठी अंदाजे 62 लाख 45 हजार 741 रुपयांचा खर्च येणार आहे. या प्रकल्पामुळे प्रवाशांना वेगळा अनुभव घेता येणार आहे.

Mumbai Central Station
प्रतीक्षालयाचा आराखडा

विमानतळा सारखा प्रवाशांना येणार अनुभव

पश्चिम रेल्वे आपल्या प्रवाशांना उत्तम सुविधा देण्यासाठी अनेक प्रयोग करत आहेत. त्यांच्या एक भाग म्हणून मुंबई सेंट्रल स्थानकात आधुनिक प्रतीक्षालय लवकरच उभारणार येणार आहे. या प्रतीक्षालयात अत्याधुनिक सुविधा प्रवाशांना मिळणार आहे. ज्याप्रमाणे मुंबई विमानतळावर प्रवाशांना आगमन व निर्गमन विमानांची माहिती मिळावी यासाठी स्क्रीन लावण्यात आले आहेत. प्रतीक्षालयातही याच प्रकारची सुविधा असेल. प्रवाशांना मेल-एक्स्प्रेस गाड्यांची माहिती मिळावी म्हणून एलसीडी स्क्रिन बसवण्यात येतील. तसेच प्रवाशांना गाड्यांची माहिती मिळावी यासाठी तेथे उद्घोषणा यंत्रणाही बसविण्यात येणार आहे.

Mumbai Central Station
प्रतीक्षालयाचा आराखडा

प्रवाशांना या सुविधा मिळणार

या आधुनिक प्रतीक्षालयात आरामदायी सोफा, डायनिंग टेबल्स, आधुनिक बाथरुम विथ बाथ कीट, वाचनालय, मोबाईल चार्जिंग पॉईंट, लॅपटॉप सिटिंग अरेंजमेंट, कॅफे सर्व्हिस, बुफे सर्व्हिस, ट्रॅव्हल कीट, वायफाय, रेल्वे गाड्यांची सद्य:स्थिती जाणून घेण्यासाठी उद्धोषणा यंत्रणा, एलईडी स्क्रीनवर आगमन-प्रस्थान करणार्‍या रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक अशा सुविधा या प्रतीक्षालयात प्रवाशांना उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. मात्र, या प्रतीक्षालयाच्या सुविधेसाठी प्रवाशांना शुल्क मोजावे लागणार आहे.

हेही वाचा - शब-ए-बारात संदर्भात गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचना जारी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.