ETV Bharat / state

दूध खरेदी दरांबाबत मंगळवारी दुग्धविकास मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक - milk agitation news

'कोरोना'मुळे दूध व दुग्धजन्य पदार्थांना मागणी नसल्याचे दूध संघ कमी दराने दूध खरेदी करीत आहेत, यामुळे हा व्यवसाय अडचणीत आला आहे. या समस्यांच्या अनुशंगाने चर्चा करण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री सुनील केदार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील समिती सभागृहात मंगळवारी दुपारी दोन वाजता ही बैठक होत आहे.

दूध खरेदी दर
दूध खरेदी दर
author img

By

Published : Jul 20, 2020, 7:12 PM IST

मुंबई - दूध प्रश्नावरुन भाजपने सरकारवर टीका करत आंदोलन केले. यानंतर, दुधाच्या दरातील घट आणि दूध दरप्रश्नी चर्चा करण्यासाठी मंगळवारी दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनिल केदार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक बोलावली आहे.

राज्यात गेल्या चार महिन्यांपासून 'कोरोना'मुळे दूध व दुग्धजन्य पदार्थांना मागणी नसल्याचे दूध संघ कमी दराने दूध खरेदी करीत आहेत. त्यामुळे हा व्यवसाय अडचणीत आला आहे. दुधाला दर मिळत नसल्यामुळे शेतकरी नेते आणि दूध उत्पादक शेतकरी हे प्रति लिटर १० रुपयेप्रमाणे थेट अनुदान त्यांच्या बँक खात्यावर जमा करावे, दुध भुकटीच्या निर्यातीसाठी प्रति किलो ५० रुपये अनुदान द्यावे, गायीच्या दूधाला प्रति लिटर ३० रुपये दर द्यावा, अशी मागणी करत आहेत.

या विविध समस्यांच्या अनुशंगाने शेतकरी आणि दुध संघाचे प्रश्न समजावून घेवून त्यासंबंधी प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री सुनील केदार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील समिती सभागृहात मंगळवारी दुपारी दोन वाजता ही बैठक होत आहे. या बैठकीला महानंद'चे अध्यक्ष, दुग्ध व्यवसाय विभागाचे प्रधान सचिव, आयुक्त, विविध शेतकरी संघटनेचे प्रमुख, तसेच राज्यभरातील विविध दूध संघांचे अध्यक्ष, व्यवस्थापकीय संचालक बैठकीला उपस्थित राहणार आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.