मुंबई - राजकीय नेते आणि कार्यकर्ते निवडणुकीनिमित्त येतात नंतर मात्र कोणीच येत नाही. अशी तक्रार दिव्यांग असलेल्या प्रेमा शिंदे(७५) यांनी केली. प्रेमा यांनी आज(सोमवार) वरळीच्या जांबोरी मैदान येथील मतदान केंद्रात मतदान केले.
प्रेमा शिंदे या जन्मापासून दिव्यांग आहेत. पायाला दिव्यंगत्व असल्याने त्यांची उंची अडीच फुट इतकीच आहे. सोमवारी त्यांनी वरळी येथील जांबोरी मैदान येथील पालिका शाळेत मतदान केले. मतदान करण्यासाठी त्यांना घरापासून मतदान केंद्रापर्यंत शेजारच्या महिलेची मदत घेऊन चालत यावे लागले. मतदान केंद्रावर पोहोचल्यावर त्यांना व्हीलचेअर देण्यात आली. मतदानाचा हक्क बजावल्यानंतर त्या 'ईटीव्ही भारत'शी बोलत होत्या.
हेही वाचा - सेरेबल पाल्सी आजाराने त्रस्त असलेल्या २१ वर्षीय तरुणाने केले मतदान
मतदान करून झाल्यावर बोलताना त्या म्हणाल्या कि, इतक्या निवडणुका झाल्या मात्र, याच निवडणुकीत मला व्हीलचेअर भेटली इतकीच सुधारणा आत्तापर्यंत झाली आहे. निवडणुकीच्या वेळी कार्यकर्ते, नेते येत असतात. मात्र, नंतर ५ वर्षे कोणीच येत नसल्याची खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
हेही वाचा - वरळी मतदारसंघातील बावन्न चाळ मतदान केंद्रात फेर मतदान घ्या; राष्ट्रवादीची मागणी