मुंबई - देशात महिलांवर होणारे अत्याचार वाढत चालले आहेत. काही दिवसांपूर्वी हैदराबाद येथे एका युवतीवर सामूहिक बलात्कार करून तिला जाळण्यात आले होते. या घटनेचे पडसाद देशभरात उमटत आहेत. या घटनेचा निषेध करताना मरीन ड्राईव्ह येथे नेरुळहुन पायाने दिव्यांग असलेला संजीव यादव एकटा आला होता. मरीन ड्राईव्हला निषेध करण्यास बंदी असल्यामुळे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले होते. नंतर, त्याला समज देऊन सोडण्यात आले. त्याच्याशी बातचीत केली आहे 'ईटीव्ही भारत'चे प्रतिनिधी अक्षय गायकवाड यांनी...
हैदराबाद येथील कृर घटना पेपरमध्ये वाचून मला धक्काच बसला. देशात चुकीच्या घटना सुरू आहेत. कायदा सुव्यवस्थेचा कुणाला धाक उरलेला नाही. म्हणून मी नेरुळ वरून मरीन ड्राईव्ह येथे निषेध व्यक्त करण्यासाठी आलो होतो. या भागात मंत्रालय असल्यामुळे मी निषेध करण्यासाठी ही जागा निवडली. अशा आरोपींवर जर वेळेतच योग्य कारवाई झाली तर आंदोलन किंवा निषेध याचा प्रश्नच उपस्थित होत नाही. त्यामुळे अशा लोकांवर लवकरात लवकर कारवाई झाली पाहिजे. महिला सुरक्षित नाही हे चित्र बदलले पाहिजे. अशा भावना यादव यांनी व्यक्त केल्या.
हेही वाचा - प्रकल्पाचा आढावा घेणे म्हणजे स्थगिती नाही - एकनाथ शिंदे यांचे भाजपला उत्तर
दरम्यान, हैदराबाद, राजस्थान येथील बलात्कार आणि हत्येचा देशभरातून निषेध व्यक्त करण्यात येत आहे. कायदा आणखी कठोर करण्यात यावा, आरोपींना कठोर शिक्षा करण्यात यावी ही मागणी संपूर्ण देशातून करण्यात येत आहे. तसेच वाढत्या घटनांकडे बघता खरच महिलांसाठी ही देश सुरक्षित आहे का असे प्रश्नही उपस्थित केले जात आहेत.
हेही वाचा - मुंबई-अहमदाबाद महामार्गावर अवैध गुटख्याची वाहतूक; दोघांना अटक