ETV Bharat / state

JJ Hospital Financial Scam : जेजे रुग्णालयातील डॉक्टरांनी केली परदेश वारीवर उधळपट्टी; गिरीश महाजन म्हणाले... - financial scam

डॉक्टरांना देव मानला जातो. परंतु जे जे रुग्णालयातील डॉक्टरांनी सुमारे साडेसहा कोटी रुपये विविध कारणाच्या मदतीसाठी मागवून आर्थिक गैरव्यवहार केल्याची बाब ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू यांनी चव्हाट्यावर आणली. दरम्यान, महिनाभरात कारवाई केली जाईल, अशी ग्वाही वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी दिल्याची माहिती प्रभू यांनी विधिमंडळात प्रसारमाध्यमाना दिली.

गिरीश महाजन
गिरीश महाजन
author img

By

Published : Mar 17, 2023, 6:10 PM IST

मुंबई : डॉक्टरांना देव मानले जाते. परंतु जे जे रुग्णालयातील डॉक्टरांनी सुमारे साडेसहा कोटी रुपये विविध कारणाच्या मदतीसाठी मागवून आर्थिक गैरव्यवहार केल्याची बाब ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू यांनी चव्हाट्यावर आणली आहे. दरम्यान, महिनाभरात कारवाई केली जाईल, अशी ग्वाही वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी दिल्याची माहिती प्रभू यांनी विधिमंडळात प्रसारमाध्यमाना दिली.

साडेसहा कोटी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार : जे जे रुग्णालयातील सुमारे १५ खात्यातील डॉक्टरांनी २०२१ मध्ये सामाजिक कामाकरिता मदतीच्या नावाने साडेसहा कोटी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार आणि भ्रष्टाचार केला. रुग्णालयाच्या नावाने बँकेत खाते काढून, देशभरातून पैसे गोळा केले. हा पैसा परस्पर आपल्या वैयक्तिक खात्यात वर्ग केला. त्यातून परदेशीवारी केली. विधिमंडळात यावर कारवाई करावी अशी मागणी केली होती. दरम्यान तीस दिवसाच्या कारवाई करू असे, आदेश वैद्यकीय संचालक मंडळाने दिले होते. परंतु आजवर संबंधित डॉक्टरांवर कारवाई झाली नाही. उलट डॉक्टरांना पाठीशी घालण्याचे काम झाले. आज विधानसभेत याबाबत पुन्हा प्रश्न उपस्थित करत आजवर त्यांच्यावर का गुन्हा दाखल केला नाही, डॉक्टरांवर तात्काळ कारवाईची करण्याची मागणी सुनिल प्रभू यांनी केली आहे.

महिनाभरात कारवाई करणार : वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी यावर उत्तर दिल्याचे आमदार प्रभू म्हणाले. आजवर कारवाई व्हायला हवी होती. परंतु संचालक मंडळांने कारवाई केलेली नाही. सुमारे दहा ते पंधरा विभागीय खात्यांतील डॉक्टरांचा यात समावेश असून त्यांची नावे वाचून दाखवली. तसेच, डॉक्टरांनी उधळले पैसे कोषागारात जमा केले जातील. येत्या महिनाभरात कारवाई करून चौकशीचा अहवाल सादर केला जाणार असल्याची ग्वाही वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी दिल्याचे आमदार प्रभू यांनी सांगितले. ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू यांनी विविध कारणांसाठी सुमारे साडेसहा कोटी रुपयांची मदत मागून जेजे रुग्णालयातील डॉक्टरांनी केलेला आर्थिक गैरव्यवहार चव्हाट्यावर आणला. दरम्यान, वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी महिनाभरात कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन दिल्याची माहिती प्रभू यांनी विधिमंडळात प्रसारमाध्यमांना दिली.

हेही वाचा - Amruta Fadnavis Blackmail Case : अमृता फडणवीस फसवणूक प्रकरण; अनिक्षा जयसिंगानीला 21 मार्चपर्यंत पोलीस कोठडी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.