ETV Bharat / state

राज्यात खासगी कौशल्य विद्यापीठ स्थापन करणार, मंत्रिमंडळात निर्णय

महाराष्ट्रात स्वयंअर्थसहाय्यित तत्वावर खासगी कौशल्य विद्यापीठ स्थापन करण्याबाबत आज (दि. 13 जाने.) मंत्रिमंडळात निर्णय झाला आहे. तसेच कार्यपध्दतीसाठी मार्गदर्शक सूचना व मॉडेल विधेयकास मान्यताही मिळाली आहे.

मंत्रालय
मंत्रालय
author img

By

Published : Jan 13, 2021, 7:13 PM IST

Updated : Jan 13, 2021, 8:29 PM IST

मुंबई - महाराष्ट्रात स्वयंअर्थसहाय्यित तत्वावर खासगी कौशल्य विद्यापीठ स्थापन करण्याबाबत आज (दि. 13 जाने.) मंत्रिमंडळात निर्णय झाला आहे. तसेच कार्यपध्दतीसाठी मार्गदर्शक सूचना व मॉडेल विधेयकास मान्यताही मिळाली आहे.

बोलताना मंत्री मलिक

आरोग्‍य विज्ञान अभ्यासक्रमाचे नवीन महाविद्यालय सुरू करण्याचे प्रस्ताव महाराष्‍ट्र आरोग्‍य विज्ञान विद्यापीठ व शासनास सादर करण्यासाठी सुधारणा करण्याचा निर्णय आज (बुधवार) झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. त्याप्रमाणे सुधारणा करून अध्यादेश काढण्यात येणार आहे.

कोरोनामुळे बहुतांशी सामाजिक व आर्थिक व्यवहार, घडामोडी मंदावल्याने, थांबलेल्या असल्याने, विविध संस्थांच्या महाविद्यालय इमारत तसेच रुग्णालयाचे बांधकाम, त्यांच्या परवानग्या, नोंदणी तसेच कागदपत्र तयार करण्यास बऱ्याच अडचणी येऊन, निकषांची पुर्तता करण्यासाठी पुरेसा कालावधी मिळाला नाही. त्यामुळे विद्यापीठाच्या अधिसुचनेमधील अंतिम मुदतीपर्यंत (31 ऑक्टोबर, 2020 पर्यंत) परीपूर्ण प्रस्ताव सादर करणे शक्य झाले नाही.

त्यामुळे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ अधिनियम, 1998 मधील या कलमांमध्ये आरोग्‍य विज्ञान अभ्यासक्रमाचे नवीन महाविद्यालय सुरू करण्याचे प्रस्ताव महाराष्‍ट्र आरोग्‍य विज्ञान विद्यापीठ व शासनास सादर करण्यासाठी सुधारणा करण्याचा विचार सुरु होता. त्यानुषंगाने महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ अधिनियम, 1998 मध्ये अध्यादेशाद्वारे सुधारणा करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

आता शैक्षणिक वर्ष 2021-22 साठी उच्चतर शिक्षणाचे नवीन महाविद्यालय किंवा संस्था सुरू करण्यासाठी परवानगी मागणारे व्यवस्थापन, दिनांक 28 फेब्रूवारी, 2021ला किंवा त्यापूर्वी विद्यापीठाच्या कुलसचिवाकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकणार आहे. तसेच सर्व अर्जांची विद्यापीठामार्फत नियोजन मंडळाकडून छाननी करून आणि व्यवस्थापन परिषदेच्या संमतीने ते अर्ज व्यवस्थापन परिषदेला उचित वाटतील अशा शिफारशींसह दिनांक 30 एप्रिल, 2021 किंवा त्यापूर्वी शासनाकडे पाठवण्यात येतील.

हेही वाचा - प्रतीक्षा अखेर संपली..! राज्याच्या विविध जिल्ह्यांमध्ये लस दाखल

हेही वाचा - सर्वांसाठी उपनगरीय रेल्वे सेवा सुरू करण्याचा निर्णय लांबणीवर

Last Updated : Jan 13, 2021, 8:29 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.