ETV Bharat / state

मुंबईत दीड दिवसांच्या 62 हजार गणेश मूर्तींचे विसर्जन - दीड दिवसांच्या गणपती

मुंबईत गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. अकरा दिवस मुंबईकर तल्लीन होऊन बाप्पाची सेवा करतात. गणेशोत्सवादरम्यान दीड, पाच, सात आणि अकरा दिवसांनी गणेश मूर्तींचे विसर्जन केले जाते. मुंबईत आज दीड दिवसांच्या गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले.

दीड दिवसांच्या बाप्पाला भक्तिमय वातावरणात निरोप
author img

By

Published : Sep 3, 2019, 9:34 PM IST

Updated : Sep 4, 2019, 2:56 PM IST

मुंबई - आपल्या लाडक्या बाप्पाची मुंबईकरांनी सोमवारी मोठ्या भक्तिभावाने प्रतिष्ठापना केली. मंगळवारी दीड दिवसांच्या बाप्पाला भाविकांनी भक्तिमय वातावरणात निरोप दिला. मुंबईत मंगळवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंत 38 हजार 570 गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. रात्री उशिरा तसेच सकाळपर्यंत विसर्जन सुरू राहणार असल्याने या आकड्यात आणखी वाढ होईल.

दीड दिवसांच्या बाप्पाला भक्तिमय वातावरणात निरोप

हेही वाचा-मुंबईतल्या दोन वर्षीय आरव कदमची 'इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड'मध्ये नोंद

मुंबईत गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. अकरा दिवस मुंबईकर तल्लीन होऊन बाप्पाची सेवा करतात. गणेशोत्सवा दरम्यान दीड, पाच, सात आणि अकरा दिवसांनी गणेश मूर्तींचे विसर्जन केले जाते. मुंबईत मंगळवारी दीड दिवसांच्या गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. त्यासाठी पालिकेने चौपाटीवर योग्य त्या सोयी सुविधा पुरवल्या आहेत. विसर्जनासाठी पालिकेने कृत्रिम तलाव उपलब्ध करून दिले आहेत.

दीड दिवसाच्या गणेश मूर्तींचे विसर्जन केले जात असतानाच दुपारी २ वाजून ४१ मिनिटांनी समुद्राला भरती होती. यावेळी ४.५४ मीटरच्या लाटा उसळल्या. यावेळी समुद्रात जाणे जीवावर बेतू शकते. यामुळे लाईफ गार्डची नियुक्ती करण्यात आली होती. दुपारी भरती असल्याने गणेशभक्त कमी प्रमाणात विसर्जनासाठी आले होते. सायंकाळनंतर मात्र विसर्जनाच्या ठिकाणी भाविकांची बाप्पाला निरोप देण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

62 हजार गणेश मूर्तींचे विसर्जन -

बुधवारी सकाळी 6 वाजेपर्यंत दीड दिवसांच्या एकूण 61 हजार 929 गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. त्यात सार्वजनिक 201 तर घरगुती 61728 मूर्तींचा समावेश आहे. कृत्रिम तलावांमध्ये 14 हजार 490 गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यात आले. त्यात सार्वजनिक 48 आणि घरगुती 14442 गणेशमूर्तींचा समावेश आहे.

Intro:मुंबई - आपल्या लाडक्या बाप्पाची मुंबईकरांनी काल सोमवारी मोठ्या भक्तिभावाने प्रतिष्ठापना केली. आज दिड दिवसांच्या आपल्या लाडक्या बाप्पाला भाविकांनी भक्तिमय वातावरणात निरोप दिला. मुंबईत सायंकाळी सहा वाजेपर्यंत ९०९७ गणेश मूर्तींचे विसराजां करण्यात आले. हा आकडा रात्रीपर्यंत आणखी वाढेल. Body:मुंबईत गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. अकरा दिवस मुंबईकर तल्लीन होऊन बाप्पाची सेवा करतात. गणेशोत्सवा दरम्यान दीड, पाच, सात आणि अकरा दिवसांनी गणेश मूर्तींचे विसर्जन केले जाते. मुंबईत आज दीड दिवसांच्या गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. त्यासाठी पालिकेने चौपाटीवर योग्य त्या सोयी सुविधा पुरवल्या आहेत. विसर्जनासाठी पालिकेने कृत्रिम तलाव उपलब्ध करून दिले आहेत. दिड दिवसाच्या गणेश मूर्तींचे विसर्जन केले जात असतानाच दुपारी २ वाजून ४१ मिनिटांनी समुद्राला भरती होती. यावेळी ४.५४ मीटरच्या लाटा उसळल्या. यावेळी समुद्रात जाणे जीवावर बेतू शकते. यामुळे लाईफ गार्डची नियुक्ती करण्यात आली होती. दुपारी भरती असल्याने गणेशभक्त कमी प्रमाणात विसर्जनासाठी आले होते. सायंकाळनंतर मात्र विसर्जनाच्या ठिकाणी भाविकांची आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

९०९७ गणेश मूर्तींचे विसर्जन -
दिड दिवसांच्या गणेश मुर्त्यांचे आज विसर्जन करण्यात आले. सायंकाळी ६ वाजेपर्यंत दिड दिवसांच्या एकूण ९०९७ गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. त्यात सार्वजनिक २० तर घरगुती ९०७७ मूर्तींचा समावेश आहे. कृत्रिम तलावांमध्ये २३४१ गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यात आले. त्यात सार्वजनिक ३ आणि घरगुती २३३८ गणेशमूर्तींचा समावेश आहे.

बातमीसाठी vis Conclusion:
Last Updated : Sep 4, 2019, 2:56 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.