ETV Bharat / state

'अन्नपूर्णी'तील वादग्रस्त सीन प्रकरणी अभिनेत्री नयनतारासह आठ जणांविरुद्ध ठाणे जिल्ह्यात गुन्हा दाखल

Case against Nayantara : अन्नूर्णी चित्रपटातील एका सीनवर आक्षेप घेत यामुळे धार्मिक भावना दुखावल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. या चित्रपटाची अभिनेत्री नयनतारा, निर्मात्यासह एकूण आठ जणाविरुद्ध तक्रार दाखल झाली आहे. दरम्यान, या चित्रपटाचं प्रसारण थांबवण्याचा निर्णय नेटफ्लिक्सनं घेतला आहे.

Case against Nayantara
अभिनेत्री नयनतारा
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 12, 2024, 11:25 AM IST

Updated : Jan 12, 2024, 12:59 PM IST

ठाणे - Case against Nayantara :अभिनेत्री नयनतारा 'अन्नपूर्णी' चित्रपटातील एका प्रसंगामुळे अडचणीत आल्याचं दिसतंय. महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील पोलिसांनी अभिनेत्री नयनतारा हिच्यासह आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या चित्रपटातील काही दृश्यांमुळे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या असल्याची तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

Case against Nayantara
अन्नपूर्णी चित्रपटातील दृष्यावर गुन्हा दाखल केलेले कार्यकर्ते

मीरा-भाईंदर येथील रहिवासी असलेल्या ४८ वर्षीय तक्रारदाराने नया नगर पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, हा चित्रपट ‘लव्ह जिहाद’लाही प्रोत्साहन देतो. निर्माण झालेल्या वादानंतर नेटफ्लिक्सने या चित्रपटाचं स्ट्रीमींग थांबवलं आहे. नया नगर पोलिस ठाण्यातील स्टेशन हाऊस ऑफिसरने सांगितले की, अभिनेत्री नयनतारा आणि चित्रपटाच्या निर्मात्यासह आठ जणांविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम १५३-ए (विविध गटांमधील वैर वाढवणे), २९५-ए आणि 505 (2) 34 या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबई पोलिसांनी गुरुवारी सांगितले की, दोन उजव्या विचारसरणीच्या कार्यकर्त्यांनी अभिनेत्री नयनतारा आणि चित्रपटाशी संबंधित इतरांविरुद्ध स्वतंत्र तक्रारी दाखल केल्या आहेत आणि त्यातील काही दृश्यांमुळे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप केला आहे. "बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी दोन दिवसांपूर्वी पश्चिम उपनगरातील ओशिवरा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती आणि या संदर्भात चौकशी सुरू आहे," असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

ओटोटीवर प्रदर्शित झालेला अन्नपूर्णी या चित्रपटातील स्टार कास्टवर महाराष्ट्रात प्रथम नया नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रात्रीच्या सुमारास नया नगर पोलीस ठाण्यात हिंदू संघटनेचे कार्यकर्ते अरुप मुखर्जी यांनी गुन्हा दाखल केला. या चित्रपटात हिंदू समाजाच्या धार्मिक भावना भडकवणारी दृश्य विधाने वापरलेले असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

इतिहासाचा कोणताही पुरावा चित्रपटाचे लेखक, दिग्दर्शिक, निर्माता यांच्याकडे नसताना त्यांनी हिंदू देवी देवता बद्दल आक्षेपार्ह विधान या चित्रपटामध्ये वापरले आहेत. तसेच लव्ह जिहाद या विषयाला जाणून बुजून या चित्रपटामध्ये प्रोत्साहित केलेले असल्याचा आरोपही केला आहे. या चित्रपटातील दृश्यांमुळे सकल हिंदु समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप ठेवून, अन्नपुर्णी या चित्रपटाचे दिग्दर्शक निलेश कृष्णा, अभिनेञी नयनतारा, अभिनेता जय साठयाराज, निर्माता जतीन सेठी, आर रवींद्रन, पुनीत गोयंका तसेच झी स्टुडिओचे चिफ बिझनेस ऑफिसर शारिक पटेल, ट्रेन्डेन्ट आर्ट, तसेच नेटफ्लिक्स इंडीया हेड मोनिका शेरगील यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. यात अजून कुणालाही अटक करण्यात आलेली नाही.

हिंदू आयटी सेलचे संस्थापक रमेश सोलंकी यांनी दक्षिण मुंबईतील लोकमान्य टिळक मार्ग पोलिस स्टेशनमध्ये दुसरी तक्रार दाखल केली होती, असे आणखी एका अधिकाऱ्याने सांगितले. सोळंकी यांनी आरोप केला आहे की, हा चित्रपट भगवान रामाचा अपमान करत असून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावण्यासाठी हा चित्रपट जाणूनबुजून प्रदर्शित करण्यात आला आहे.

काय होता अन्नपूर्णीतील वादग्रस्त सीन ?- धर्मिक वातावरणात वाढलेल्या शाकाहारी अन्नपूर्णीला शेफ बनायचे आहे. परंतु यासाठी तिला मांसाहाराची चव घेणे अपरिहार्य ठरते. यासाठी तिला जो सल्ला मिळतो त्या संवादात मांसाहाराचे समर्थन करण्यात आले असून यातील काही मुद्दे वादग्रस्त ठरले आहेत. शिवाय यामध्ये सर्व प्रकारची मदत करणाऱ्या आणि तिच्या स्वप्नपूर्तीसाठी धडपडणाऱ्या दुसऱ्या धर्माच्या मित्रासोबत अन्नपूर्णी आंतरधर्मिय लग्नाचा निर्णय घेते. ही गोष्टही काहींना खटकल्याचं दिसतंय.

हेही वाचा -

  1. 'इंडियन पोलीस फोर्स'चा अनुभव सांगताना विवेक ओबेरॉय म्हणाला, "रोहित शेट्टी फिल्म इंडस्ट्रीचा विक्रम बक्षी"
  2. विजय सेतुपती आणि कतरिनाच्या मेरी ख्रिसमसचं नेहा धुपियानं केलं कौतुक
  3. 'त्या' वादग्रस्त सीनमुळे नयनतारा स्टारर 'अन्नपूर्णी'चे नेटफ्लिक्सनं थांबवले प्रसारण, तक्रार दाखल

Last Updated : Jan 12, 2024, 12:59 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.