ETV Bharat / state

न्या. एस.एस.शिंदे, मिलिंद जाधव यांच्या खंडपीठाने दोन दिवसात केली 190 प्रकरणांवर सुनावणी - मुंबई उच्च न्यायालय

मुंबई उच्च न्यायालयाचे (Mumbai High Court) न्या. एस.एस.शिंदे आणि न्या. मिलिंद जाधव यांच्या खंडपीठाचे (A bench of Justice SS Shinde and Milind Jadhav ) कामकाज गुरुवार आणि शुक्रवारी सलग दोन दिवस रात्री आठ वाजेपर्यत सुरू होते. दोन्ही दिवस खंडपीठासमोर 190 हून अधिक प्रकरणांवर सुनावणी पार ( heard 190 cases in two days) पडली. गुरुवारी न्यायालयाच्या कामकाजाची दखल घेत केंद्रींय विधी मंत्र्यांनी न्या. शिंदे यांची स्तुती केली.

heard cases
सुनावणी
author img

By

Published : Jun 10, 2022, 10:45 PM IST

मुंबई: मुंबई उच्च न्यायालयाचे नियमित कामकाज सकाळी 10.30 वाजता सुरु होऊन संध्याकाळी 4.30 वाजता संपते. मात्र, गुरुवार आणि शुक्रवार सलग दोन दिवस न्या. संभाजी शिंदे आणि न्या. मिलिंद जाधव यांच्या खंडपीठाचे कामकाज रात्री आठ वाजेपर्यत सुरु होते. दोन्ही दिवसात या खंडपीठाच्यासमोर 190 हून अधिक खटल्यांवर सुनावणी पार पडली.

केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी न्या. शिंदे यांच्या कामाची दखल घेतली. आणि न्या. शिंदे यांच्या चेंबरवरील नावाचे फलक असलेला फोटो ट्विट करत मुंबई न्यायालयाचे कामकाज रात्री 8 वाजेपर्यत सुरु होते हे पाहून आपण आज खूप आनंदी झाल्याचे म्हटले आहे. याआधी 2001 रोजी न्यायालयाचे कामकाज पहाटे साडेतीन वाजेपर्यंत चालवत न्या. काथावालांनी रचला इतिहास होता.

उन्हाळी सुटीतील न्यायालय असूनही न्या. शाहरुख काथावाला व न्या. सुरेंद्र तावडे यांच्या खंडपीठाने जवळपास 13 तास सलग न्यायालयीन कामकाज केले होते. न्यायमूर्ती न्या. संभाजी शिंदे हे मुंबई उच्च न्यायालयातील तिसरे ज्येष्ठ न्यायमूर्ती असून ते ऑगस्ट २०२२ रोजी निवृत्त होत आहेत. त्यांची राजस्थान उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायवृंदाने शिफारस केली आहे.

हेही वाचा : BMC Election 2022 : प्रभाग आरक्षणविरोधातील हरकतींवर सुनावणी नाही; काँग्रेस कोर्टात जाणार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.