ETV Bharat / state

Bag of Gold And Silver : प्रसाद लाडांच्या दारात सापडली सोन्या चांदीने भरलेली बॅग - आमदार प्रसाद लाड

भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष आमदार प्रसाद लाड ( MLA Prasad Lad ) यांच्या घरासमोर ( found at the door of Prasad Lad) रविवार रोजी पहाटे एका अज्ञात व्यक्तीकडून सोने चांदी ने भरलेली बॅग (A bag full of gold and silver) ठेवल्याचे समोर आले. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे या प्रकरणाची माहिती माटुंगा पोलिसांना दिल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले अज्ञात व्यक्तीच्या तपास सीसीटीव्ही फुटेज च्या माध्यमातून करण्यात येत आहे.

Bag of Gold And Silver
सोन्या चांदीने भरलेली बॅग
author img

By

Published : Jul 10, 2022, 1:27 PM IST

मुंबई: माटुंगा परिसरात भाजप आमदार प्रसाद लाड यांचं घर आहे ही बॅग पहाटेच्या सुमारास लाड यांच्या घरासमोर सापडली सुरुवातीला बॅग ही अनोळखी असल्यानं भीतीचं वातावरण होतं. या घटनेची माहिती लाड यांच्या अंगरक्षकाने त्यांना दिली. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आल्यानंतर याप्रकरणी पोलीस अधिकचा तपास करत आहे. दरम्यान अशा प्रकारे आमदारांच्या घरासमोर बॅग ठेवल्यानं संशय व्यक्त केला जातंय. आज आषाढी एकदशी आहे. त्यामुळे अशा प्रकारची बॅग सापडने याकडेही संशयानं बघितलं जात आहे.

भाजपचे नेते आणि आमदार प्रसाद लाड यांच्या माटुंगा अथर्वा घराचा बाहेर एक संशयित बॅग सापडल्यानं एकच खळबळ उडाली आहे. ही घटना आज सकाळी साडेपाचच्या सुमारास उघडकीस आली. प्रसाद लाड यांच्या घराबाहेर सतत असणाऱ्या सुरक्षारक्षकानी या घटनेची माहिती प्रसाद लाड यांना दिली. त्यानंतर प्रसाद लाड यांनी स्वतः पुढकार घेऊन मुंबई पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना संपर्क साधला आणि घटनास्थळी पोलीस दाखल झाले. पोलिसांना एक बॅग मिळालेली आहे.

त्या बागेत जुन्या चलनाच्या नोटा, सिक्के आणखीन काही वस्तू सापडल्याची माहिती आहे यापूर्वीही प्रसाद लाड यांच्या घराबाहेर असं संशयित बॅग किंवा वस्तू सापडली होती प्रसाद लाड यांना यापूर्वी देखील धमकीचे पत्र आलेले आहे जेणेकरून त्यांच्या सुरक्षेला धोका असल्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून प्रसाद लाड यांनी मुंबई पोलिसांना विनंती केलेली आहे की या परिसरातील सुरक्षा वाढवावी पोलिसांची गस्त वाढवावी यामुळे भविष्यात कुठलीही अप्रिय घटना किंवा त्यांच्या सुरक्षेला धोका होऊ नये.

हेही वाचा : Attempt to kill a prisoner : कारागृहातच कैद्याला ठार मारण्याचा प्रयत्न, तुरुंगाधिकाऱ्याह सहा जणांवर गुन्हा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.