मुंबई : पावसाळ्यात बांद्रा समुद्र किनाऱ्यावर 27 वर्षांची महिला पर्यटक समुद्रात बुडाल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली. रविवार असल्याने काही पर्यटक वांद्रे येथील बँड स्टँड समुद्र किनाऱ्यावर फिरण्यासाठी आले होते. त्यावेळी त्या पर्यटकांपैकी एक महिला समुद्रात बुडाल्याची घटना उघडकीस आली आहे. ज्योती सोनार असे या महिलेचे नाव आहे.
मुंबईत पर्यटकांची गर्दी : सध्या मोठ्या प्रमाणात पावसाला सुरुवात झाली असल्याने मुंबईत पर्यटकांची मोठी गर्दी झाल्याचे दिसून येत आहे. मात्र हे पर्यटक समुद्रकिनारी खोल जात असल्याने मोठा धोका निर्माण झाला आहे. वांद्रा येथील समुद्रकिनारी पर्यटक मोठी गर्दी करत आहेत. ज्योती सोनार या देखील समुद्रकिनारी फिरायला आल्या होत्या. मात्र सायंकाळी वांद्रा समुद्रकिनारी तोल गेल्याने महिला समुद्राच्या पाण्यात बुडाली.
अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळावर दाखल : 27 वर्षीय महिलेच्या बुडाण्याची माहिती मुंबई नियंत्रण कक्षात तिच्यासोबत असलेल्या इतर लोकांनी दिली होती. मुंबई पोलीस कंट्रोल रूमला महिला समुद्रात बुडाल्याची माहिती सायंकाळी 7.15 वाजण्याच्या सुमारास मिळाली. या महिलेसोबत असलेल्या इतर पर्यटकांची पोलीस चौकशी करत आहेत. त्याचप्रमाणे प्रत्यक्षदर्शींकडूनदेखील पोलीस माहिती घेत आहेत. मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावर महिला बुडाल्याची घटना घडल्यानंतर मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केली आहे. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाच्या जवानांनी महिलेचा शोध घेतला. मात्र, अंधारामुळे या महिलेचा शोध घेण्यात यश आले नाही.
जुहू समुद्रकिनारी चौघांचा मृत्यू - 15 जून रोजी गुजरात किनार्यावर चक्रीवादळ 'बिपरजॉय'च्या लँडफॉलच्या अगोदर तीन दिवस म्हणजे 12 जूनला जुहू समुद्र किनारी चौघा मुलांचा समुद्रात बुडून मृत्यू झाला. ही घटना जुहू समुद्रकिनारी घडली. ही मुले 12 ते 15 वर्षे वयोगटातील आहेत. सहापैकी दोघांना वाचविण्यात यश मिळाले. पावसाळ्यात समुद्राच्या लाटा उंच आणि वेगवान येत असल्याने समुद्रकिनारी जाणाऱ्या पर्यटकांनी काळजी घेण्याची गरज आहे.
हेही वाचा -