मुंबई: 10 वीच्या विद्यार्थ्यांनी यावर्षी 'सीबीएसई' बोर्ड परीक्षेत 98.6 टक्के उच्च गुण मिळवून चमकदार कामगिरी केली.
10वीतील गुणवंत विद्यार्थी:
प्रथम- विवान भीमानी (98.6 टक्के)
द्वितीय- टियाना माहेश्वरी (98.6 टक्के)
तृतीय- तनय झवेरी (98.2 टक्के)
काव्या झवेरी (९८.२ टक्के)
जान्हवी शहा (97.6 टक्के)
दृष्टी शहा (97.6 टक्के)
श्रेया पांडे (97.4 टक्के)
रिया जैस्वाल (९७.४ टक्के)
अरहम झवेरी (97.2 टक्के) असे गुण विद्यार्थ्यांना प्राप्त झालेले आहेत.
अनेकांना 100 पैकी 100 गुण: अनेक विद्यार्थ्यांनी 100/100 गुण मिळवून गणितात उत्तम कामगिरी केली. गेल्या वर्षीच्या तुलनेत, सर्वाधिक टक्केवारी म्हणजे 0.6 टक्के अर्थात अर्धा टक्केपेक्षा अधिक आहे. 100 टक्के उत्तीर्ण निकालासह, 63 टक्के 'जीबीएमएस' विद्यार्थ्यांनी 90 टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवले.
12वीचा निकाल: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या 12वीच्या गुणवंत विद्यार्थी कामगिरी पुढील प्रमाणे आहे. 'सीबीएसई' श्रेणी शैक्षणिक वर्ष 2022-23 चा निकाल याप्रमाणे 12 वीच्या विद्यार्थ्यांनी यावर्षी 96.6 टक्केंच्या सर्वोच्च गुणांसह खूप चांगली कामगिरी केली. विद्यार्थी सिमोन जेन साल्दान्हा (96.6 टक्के) नंतर सहज बक्सी (95 टक्के) तर तान्या वंजारा (92.4 टक्के) गेल्या वर्षीच्या तुलनेत विद्यार्थ्यांची एकूण कामगिरी 91 ते 100 टक्के पर्यन्त गुण मिळविले. 81 ते 90 टक्के या श्रेणीत गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांच्या दृष्टीने विद्यार्थ्यांची कामगिरी अधिक चांगली मानली जात आहे. बहुतांश विद्यार्थ्यांनी इंग्रजीमध्ये जास्त गुण मिळवले आहेत.
'सीबीएसई' बद्दलची ती पोस्ट खोटी: सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन ( CBSE Result 2022 ) इयत्ता 12वी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यासंदर्भात एक परिपत्रक सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 12वीच्या परीक्षेचा निकाल 25 जानेवारीला दुपारी जाहीर होईल, असे व्हायरल होत असलेल्या परिपत्रकात लिहिले आहे. यासंदर्भात 'ईटीव्ही भारतने' सीबीएसईचे परीक्षा नियंत्रक डॉ. सन्यम भारद्वाज यांना विचारले असता, ते म्हणाले की व्हायरल होत असलेले परिपत्रक खोटे आहे. बोर्डाने आतापर्यंत पहिल्या टर्म परीक्षेचा निकाल जाहीर केलेला नाही किंवा कोणत्याही परीक्षेचा निकाल जाहीर करण्याची तारीखही जारी केलेली नाही.
काय लिहिले आहे व्हायरल पोस्टमध्ये: सीबीएससीच्या 12वीच्या परीक्षेचा निकाल 25 जानेवारीला 2 वाजता आहे. दरम्यान, निकाल पाहण्याच्या पद्धतीत बदल करण्यात आल्याचे व्हायरल होत असलेल्या परिपत्रकात लिहिले आहे. केंद्राकडून सर्व विद्यार्थ्यांना एक युनिक युजरनेम आणि पासवर्ड दिला जाईल, असेही या पत्रात म्हटले आहे. या व्हायरल होत असलेल्या परिपत्रकाबाबत सीबीएसईचे परीक्षा नियंत्रक डॉ. सन्यम भारद्वाज म्हणाले की, परिपत्रक पूर्णपणे बनावट आहे. कोविड-19 संसर्गाच्या पार्श्वभूमीवर या वर्षी CBSE ने 10वी आणि 12वीच्या परीक्षा वर्षातून दोनदा घेण्याचा निर्णय घेतला आहे. याअंतर्गत नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात पहिल्या टर्मची परीक्षा घेण्यात आली. बोर्डाने आतापर्यंत पहिल्या टर्म परीक्षेचा निकाल जाहीर केलेला नाही किंवा कोणत्याही परीक्षेचा निकाल जाहीर करण्याची तारीखही जारी केलेली नाही.
हेही वाचा:
1. Devendra Fadnavis on Sharad Pawar : 'शरद पवार आणि नैतिकतेचा काही संबंध आहे का?'