ETV Bharat / state

Teacher Eligibility Test Result : राज्यातील शिक्षक पात्रता परीक्षेत प्राथमिक पेपर एक मध्ये 96 टक्के शिक्षक अनुत्तीर्ण - शिक्षकांचे उत्तीर्ण प्रमाण 3 पाॅईंट 70 टक्के

महाराष्ट्र (State Teacher Eligibility Test Result) राज्यातील शिक्षक पात्रता परीक्षा 21 नोव्हेंबर 2021 रोजी घेण्यात आली होती आणि तिचा निकाल लागलेला आहे. यामध्ये प्राथमिक स्तरावर 3.80 टक्के तर उच्च प्राथमिक स्तरावर गणित विज्ञान गटासाठी 1.45 टक्के तर उच्च प्राथमिक सामाजिक शास्त्र या विषयात 4.49 टक्के या रीतीने शिक्षक उत्तीर्ण झालेल्या आहेत. तर एकूण शिक्षकांचे उत्तीर्ण (primary paper one of teacher eligibility test) होण्याचे प्रमाण 3.70 टक्के इतके आहे. प्राथमिक स्तरावर 96 टक्के शिक्षक अनुत्तीर्ण (96 percent of teachers failed) झाले ही धक्कादायक बाब आहे.

Teacher Eligibility Test Result
राज्यातील शिक्षक पात्रता परीक्षेचा निकाल
author img

By

Published : Dec 25, 2022, 3:15 PM IST

मुंबई : महाराष्ट्र राज्यातील शिक्षक पात्रता परीक्षेचा निकाल (State Teacher Eligibility Test Result) जाहीर झाला. यात प्राथमिक व उच्च प्राथमिक स्तरात चारच टक्के शिक्षक उत्तीर्ण (96 percent of teachers failed) झालेले आहेत, अशी धक्कादायक बाब पुढे आलेली आहे.

यामध्ये इयत्ता पहिली ते पाचवी पर्यंत शिकवणाऱ्या शिक्षकांच्या गटासाठी पेपर एक करीता एकूण प्रवेश 2 लाख 54 हजार 428 इतके होते. त्यातून पात्र परीक्षार्थी संख्या 9674 आणि त्यामधून एकूण तीन पूर्णांक 3.80 टक्के केवळ शिक्षक उत्तीर्ण झाले . म्हणजेच 96% शिक्षक एकूण प्रवेश झालेल्या शिक्षकांपैकी अनुत्तीर्ण ठरलेले आहेत ही बाब अत्यंत चिंताजनक आहे.

तर इयत्ता सहावी ते आठवी या इयत्ता साठी शिकणाऱ्या शिक्षकांचा गट आणि पेपर 2 विज्ञान विषय यामध्ये प्रवेश झालेले एकूण प्रवेश ६४,६४७ आहे. यामध्ये पात्र शिक्षक केवळ 937 म्हणजेच 1.45 टक्के इतके प्रमाण होते. यामध्ये देखील शिक्षकांचं उत्तीर्ण होण्याचा प्रमाण काही सह कमीच आहे. त्यामुळे शिक्षकांना ही परीक्षा उत्तीर्ण झाल्याशिवाय पुढचा प्रवास सुकर होत नाही.

तर इयत्ता सहावी ते आठवी या विद्यार्थ्यांना शिकवणाऱ्या शिक्षकांचा गट पेपर दोन समाजशास्त्र यामध्ये एक लाख 49 हजार 604 प्रवेशित शिक्षक होते. त्यापैकी 6711 पात्र झालेले आहेत, ही पात्र शिक्षकांची टक्केवारी 4.19 इतकी आहे.

यासंदर्भात शिक्षक भारतीचे नेते सुभाष मोरे यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी म्हटलेला आहे की, 'शिक्षक पात्रता परीक्षा ही शिक्षकांना अनिवार्य असते प्राथमिक स्तरावर पेपर एक मध्ये खूप संख्येने शिक्षक अनुत्तीर्ण झालेले आहेत. त्यामुळे शिक्षकांना भरपूर मेहनत आणि अभ्यास करण्याची आवश्यकता यामध्ये दिसून येते.'

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.