ETV Bharat / state

मुंबईत मंगळवारी कोरोनाचे 941 नवे रुग्ण... 55 जणांचा मृत्यू - कोरोना व्हायरस मुंबई

जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूचे मुंबईत मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून येत आहे. त्यात मंगळवारी काही प्रमाणात घट दिसून आली आहे. मुंबईत मंगळवारी कोरोनाचे नव्याने 941 रुग्ण आढळून आले आहेत. तर 55 जणांचा मृत्यू झाला आहे.

941-new-corona-patients-found-on-tuesday-in-mumbai
मुंबईत मंगळवारी कोरोनाचे 941 नवे रुग्ण
author img

By

Published : Jun 17, 2020, 12:54 AM IST

मुंबई- कोरोना व्हायरसचे मुंबईत मंगळवारी नवे 941 रुग्ण आढळून आले असून 55 जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे मुंबईतील कोरोनाग्रस्तांचा आकडा 60142 वर पोहोचला आहे. तर मृतांचा आकडा 3165 वर पोहोचला आहे. मुंबईमधून आतापार्यंत 31040 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असल्याने, मुंबईत सध्या 25937 सक्रिय रुग्ण आहेत. राज्य सरकारने दिलेल्या निर्देशानुसार, पालिकेने मृतांच्या आकडेवारीत 862 मृतांची नोंद केल्याने मुंबईमधील मृतांचा आकडा 3165 वर गेल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.

जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूचे मुंबईत मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून येत आहे. त्यात मंगळवारी काही प्रमाणात घट दिसून आली आहे. मुंबईत मंगळवारी कोरोनाचे नव्याने 941 रुग्ण आढळून आले आहेत. तर 55 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांपैकी 34 रुग्णांना दिर्घकालीन आजार होते. मृतांमध्ये 43 पुरुष आणि 12 महिला रुग्ण होत्या. मृतांमध्ये 2 जणांचे वय 40 वर्षाखाली होते, 29 जणांचे वय 60 वर्षावर तर 24 जणांचे वय 40 ते 60 वर्षादरम्यान होते. मुंबईमधून मंगळवारी 915 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. यामुळे डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांचा आकडा 31040 वर पोहोचला आहे. मुंबईतील कोरोनाच्या रुग्णांचा आकडा 60142 वर पोहोचला आहे. त्यापैकी 3165 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर मुंबईमधून आतापर्यंत 31040 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. यामुळे मुंबईत सध्या कोरोनाचे 25937 सक्रिय रुग्ण असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

मुंबईत 15 जूनपर्यंत 264580 चाचण्या करण्यात आल्या. मुंबईत 9 ते 15 जूनपर्यंत रुग्ण वाढीचा दर 2.49 टक्के असून रुग्ण बरे होण्याचा दर 46 टक्के इतका आहे. मुंबईत कोरोना रुग्ण आढळून आलेल्या चाळी आणि झोपडपट्ट्या असलेल्या 823 विभाग कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आले आहेत. तर 4959 इमारतींमध्ये काही मजले तर काही विंग कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आले आल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

पालिकेने मृतांचा आकडा सुधारला ..
मुंबई महापालिकेने कोरोनाच्या मृतांची आकडेवारी लपवल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. त्यानुसार राज्य सरकारने दिलेल्या निर्देशानुसार पालिकेने आपल्या आकडेवारीत 862 मृतांची नोंद केली आहे. यामुळे मुंबईतील मृतांचा आकडा 3165 वर पोहोचला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.