मुंबई - मैत्रीत पैशांसाठी दगाबाजी करीत आपल्याच मित्राचे 9 लाख रुपये चोरून पळ काढणाऱ्या आरोपीला मुंबईच्या सायन पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणात आतापर्यंत पोलिसांनी 9 लाखांपैकी 6 लाख रुपये हस्तगत केले आहेत.
काही दिवसांपूर्वी पीडित तक्रारदार समीर कारंडे हे त्याचा मित्र श्रीकांत निंबाळकरला घेऊन मुंबईतील सायन परिसरात गाड्याचे सुटे स्पेअरपार्ट विकत घेण्यासाठी त्याच्या चारचाकी वाहानाने आले होते. या दरम्यान पीडित तक्रारदार समीर कारंडे यांनी त्यांच्यासोबत असलेले 9 लाख रुपयांची बॅग आरोपी श्रीकांत समोरच गाडीत ठेवली होती. समीर कारंडे यांचा आणखीन एक मित्र त्यांना विक्रोळी येथे भेटला असता हे तिघेही एकत्र सायन परिसरातील गॅरेज गल्ली परिसरात दाखल झाले.
तक्रारदार समीर कारंडे हे त्यांच्या दोन्ही मित्रासह सायन परिसरातील एका दुकानात सोअरपार्ट्स घेण्याकरिता आले असता या दरम्यान श्रीकांत निंबाळकर हा त्याला त्याच्या मैत्रिणीचे सतत फोन येत असल्याचे सांगत तेथून निघून गेला. मात्र जात असताना त्याने समीर कारंडे यांच्या गाडीतील 9 लाख रुपये सुद्धा चोरले होते. गाडीतील ठेवलेले 9 लाख रुपये चोरीला गेले असल्याचे लक्षात येताच समीर कारंडे हे याची तक्रार सायन पोलीस ठाण्यात केली. सायन पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास केला असता घटनस्थळवरील लावण्यात आलेल्या सीसीटीवीत श्रीकांत निंबाळकर हा गाडीतून पैसे चोरत असताना दिसले. या प्रकरणी पोलिसांनी श्रीकांत निंबाळकर याला समीर कारंडे यांच्या तक्रारीवरून नवी मुंबई येथून अटक केली. आरोपीकडून आतापर्यंत 6 लाख रुपये हस्तगत केले आहेत. पुढील तपास पोलीस करीत आहेत.