ETV Bharat / state

चेंबूरच्या टाटानगर वसाहतीत ९ कावळ्यांचा मृत्यू

author img

By

Published : Jan 11, 2021, 8:04 AM IST

मागील दहा महिन्यापासून देश कोरोनाच्या संकटाशी लढत असून हे संकट अजूनही दूर झालेले नाही. अशात आता बर्ड फ्ल्यूचे संकट ओढवले आहे. महाराष्ट्रात परभणी जिल्ह्यात बर्ड फ्ल्यूने कोंबड्या मेल्याचे स्पष्ट झाले आहे. तर इतरही अनेक ठिकाणी पक्ष्यांचा मृत्यू होत आहे.

crow
कावळा

मुंबई - टाटानगर वसाहतीत आज नऊ कावळे मृतावस्थेत आढळले. देशातील बर्ड फ्ल्यूचा धोका पाहता या कावळ्यांचे नमुने चाचणीसाठी पाठवल्याची माहिती सहायक पशु तज्ञ राजेश चातुर यांनी दिली. चेंबूर येथील वाशीनाका परिसरात विविध रासायनिक कंपन्या आहेत. या कंपन्यामधून धूर आणि विषारी वायू बाहेर पडत असल्याने चेंबूर परिसरात प्रदूषणाचे प्रमाण जास्त आहे. याचे वाईट परिणाम नागरिकांच्या आणि प्राणी-पक्ष्यांच्या स्वास्थ्यावर होताना दिसत आहेत.

देशात अनेक ठिकाणी पसरला बर्ड फ्ल्यू -

हिमाचल प्रदेश, गुजरात, राजस्थान आणि झारखंडमध्ये या फ्ल्यूला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रात देखील परभणी जिल्ह्यात बर्ड फ्ल्यूने कोंबड्या मेल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे बेफिकीर न राहता नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे. कोरोनामध्ये आपण मास्क लावणे, हात धुणे आणि इतर प्रकारची काळजी घेत आहोत, तीच काळजी घ्यावी. ताप, सर्दी, खोकला, अंगदुखी अशी लक्षणे असल्यास त्वरित डॉक्टरकडे जावे, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.

बर्ड फ्ल्यू म्हणजे काय?

बर्ड फ्ल्यू हा एक संसर्गजन्य आजार आहे. हा विषाणू असून या आजाराची सुरुवात 1997 मध्ये हाँगकाँग येथील एका पोल्ट्री फार्ममध्ये झाली होती. तेव्हापासून हा आजार जगाची पाठ काही सोडताना दिसत नाही. एव्हीयन इन्फ्ल्युएन्झा व्हायरस (H5N1) या विषाणूमुळे हा आजार पक्षांमध्ये होतो. तर, या आजाराने संक्रमित झालेल्या पक्षांच्या संपर्कात आल्यास मानवाला याचा संसर्ग होतो. याकडे दुर्लक्ष केल्यास, वेळेत उपचार न मिळाल्यास मृत्यू ओढावू शकतो.

असे होते संक्रमण

पक्षांना, त्यातही कोंबड्यांना नैसर्गिकरित्या या विषाणूचा संसर्ग होतो. या आजारात कोंबडी, पक्षी मोठ्या संख्येने मृत्युमुखी पडतात. तर, हा आजार झालेल्या कोंबड्यांच्या-पक्षांच्या संपर्कात आल्यास त्यांच्या मल, अनुनासिक स्त्राव, तोंडातील लाळ आणि डोळ्यातील पाणी याद्वारे मानवाला बर्ड फ्ल्यूचा संसर्ग होतो.

परभणीमध्ये बर्ड फ्ल्यूने कोंबड्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट -

जिल्ह्यातील मुरुंबा येथील 800 कोंबड्यांचा मृत्यू बर्डफ्लूमुळेच झाल्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाला काल (रविवारी) रात्री उशिरा प्राप्त झाला. त्यानंतर जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी तत्काळ या परिसरातील कोंबड्यांसह इतर सर्व पाळीव पक्षी नष्ट करण्याचे आदेश दिले आहेत. दहा किलोमीटरचा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आला असून, या ठिकाणच्या सर्व नागरिकांची आरोग्य तपासणी करण्याचे आदेश देखील दिले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.