मुंबई शिवसेनेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरीकरण शिवसेनेत उभी ( rebel in Shiv sena ) फूट पाडली. त्यानंतर नेमकी शिवसेना कोणाची याबाबतची कायदेशीर लढाई सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापिठासमोर आणि केंद्रीय निवडणूक आयोगासमोर सुरू आहे. यामध्ये केंद्रीय निवडणूक आयोगाने दोन्ही गटांना कार्यकर्ते, नेते, पदाधिकाऱ्यांच्या शपथपत्र सादर करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार दोन्ही गटांकडून केंद्रीय निवडणूक आयोगाकडे शपथपत्र दाखल करण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार केंद्रीय निवडणूक आयोगाकडे ( Shiv Sena submitted to Central Election Commission ) शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून जवळपास साडेआठ लाख शपथपत्र दाखल करण्यात आली आहेत. ही साडेआठ लाख शपथपत्र दोन ट्रक मधून केंद्रीय निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आली. एकनाथ शिंदे गटाकडूनदेखील याआधी निवडणूक आयोगाकडे शपथपत्र दाखल करण्यात आली आहेत. त्याची संख्या जवळपास अडीच लाखपर्यंत असल्याचा सांगण्यात येत आहे.
निवडणूक आयोगाने तात्पुरती स्वरूपाची केली शिवसेना नेमकी कोणाची हा वाद उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गट यांच्यात सुरू आहे. यामध्ये वादात केंद्रीय निवडणूक आयोगाने पक्षाचे चिन्ह आणि नाव दोन्ही गोठविले. उद्धव ठाकरे यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असे तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बाळासाहेबांची शिवसेना अशी दोन नाव पक्षाला देण्यात आली. त्यासोबतच उद्धव ठाकरे यांना मशाल तर एकनाथ शिंदे यांना ढाल तलवार असे चिन्हही देण्यात आले. मात्र ही व्यवस्था निवडणूक आयोगाने तात्पुरती स्वरूपाची केली आहे.
शपथपत्र केंद्रीय निवडणूक आयोगाकडे सादर नेमकी शिवसेना कोणाची यासाठी शपथपत्र ही अत्यंत महत्त्वाची असणार आहेत. त्यामुळे दोन्ही गटांकडून जास्तीत जास्त शपथपत्र केंद्रीय निवडणूक आयोगाकडे सादर करण्याची चढावर पाहायला मिळत आहे. त्यात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे साडेआठ लाख प्रतिज्ञापत्र दाखल केली आहेत. ही कागदपत्रे दोन ट्रकमधून घेऊन देण्यात आली आहेत.