ETV Bharat / state

मुंबईत कोरोनाचे 753 नवे रुग्ण, 40 रुग्णांचा मृत्यू - corona patients mumbai

मुंबईत कोरोनामुळे 7 हजार 170 रुग्णांचा मृत्यू झाल्याने सध्या 17 हजार 707 सक्रिय रुग्ण आहेत. मुंबईत कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 80 टक्क्यांवर पोहोचले आहे. तर रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 86 दिवस इतका आहे.

प्रतिकात्मक
प्रतिकात्मक
author img

By

Published : Aug 17, 2020, 9:05 PM IST

मुंबई- मुंबईत आज (सोमवारी) कोरोनाचे 753 नवे रुग्ण आढळून आले असून 40 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे मुंबईमधील कोरोनाग्रस्तांचा आकडा 1 लाख 29 हजार 479 वर पोहचला आहे. तर मृतांचा आकडा 7 हजार 170 वर पोहोचला आहे. मुंबईमधून आज 833 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

मुंबईत आतापर्यंत एकूण 1 लाख 4 हजार 301 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने सध्या 17 हजार 707 सक्रिय रुग्ण आहेत. मुंबईमधील रुग्ण बरे होण्याचा दर 80 टक्क्यांवर पोहोचला आहे. तर, रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 86 दिवसांवर पोहचला आहे. जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूमुळे मुंबईत आज 40 रुग्णांचा मृत्यू झाला. त्यापैकी 26 रुग्णांना दिर्घकालीन आजार होते. मृतांमध्ये 25 पुरुष तर 15 महिला रुग्ण आहेत.

मुंबईत कोरोनामुळे 7 हजार 170 रुग्णांचा मृत्यू झाल्याने सध्या 17 हजार 707 सक्रिय रुग्ण आहेत. मुंबईत कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 80 टक्क्यांवर पोहोचले आहे. तर रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 86 दिवस इतका आहे. मुंबईत सध्या कोरोनाचे रुग्ण आढळून आलेल्या 580 चाळी आणि झोपडपट्टी कंन्टेन्मेंट झोन घोषित करून सील करण्यात आल्या आहेत. तसेच, 5 हजार 509 इमारती व इमारतींच्या विंग, काही मजले सील करण्यात आले आहेत. कोरोनाचे निदान करण्यासाठी 6 लाख 56 हजार 690 इतक्या चाचण्या करण्यात आल्या आहेत.

हेही वाचा- मलेशियात आढळला 10 पट वेगाने संसर्ग पसरवणारा कॊरोनाच्या नवा अवतार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.