मुंबई - प्रजासत्ताक दिनानिमित्त देण्यात येणाऱ्या राष्ट्रपती पोलीस पदकांची आज (शनिवारी) घोषणा करण्यात आली. राज्यातील 54 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना हे राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे. तर देशातील एकूण १०४० पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना हे पदक प्रदान करण्यात येईल. राज्यातील 54 जणांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी सन्मानित करण्यात येणार आहे.
'या' अधिकाऱ्यांचा होणार सन्मान -
महाराष्ट्रात शौर्य पदक पदक विजेते - मिठू नामदेव जगदाळे, सुरपत बावाजी वड्डे, आशिष मारूती हलामी, विनोद राऊत, नंदकुमार अग्रे, डॉ. एमसीव्ही महेश्वर रेड्डी, समीरसिंह साळवे, अविनाश कांबळे, वसंत अत्राम, हमीत डोंगरे
विशिष्ठ सेवा पदक विजेते - अर्चना त्यागी (आयपीएस), संजय सक्सेना (आयपीएस), शशांक सांडभोर (सहा. पोलीस आयुक्त), वसंत साबळे (सहा. पोलीस निरीक्षक)
अग्निशमन सेवा पदक - अग्निशमन सेवेमध्ये उल्लेखनीय कामगिरीसाठी महाराष्ट्रातील ७ अग्निशमन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती शौर्य पदक जाहीर झाले आहे.
५ जीवन रक्षा पदक विजेते - संकटात सापडलेल्यांना वाचवून मानवतेचा आदर्श निर्माण करणाऱ्या व्यक्तींना जीवन रक्षा पदक दिले जाते. महाराष्ट्रातील ५ व्यक्तींना जीवन रक्षा पदक जाहीर झाले आहे. यामध्ये महेश पांडुरंग साबळे यांना सर्वोत्तम रक्षा पदक जाहीर झाले आहे.
केंद्रीय गृहमंत्रालयात महाराष्ट्रातील 'या' अधिकाऱ्यांना मिळाली पदकं -
धनंजय कुलकर्णी, नंदकुमार ठाकूर, अतुल पाटील, स्टेवेन्थ अँथनी, निशिकांत भुजबळ, चंद्रशेखर सावंत, मिलिंद तोरटे, सदानंद मानकर, मुकुंद पवार, संभाजी सावंत, गजानन कब्दुल, कोईमर्ज इराणी, नीलिमा आराज, इंद्रजीत कारले, गौतम पठारे, सुभाष भुजंग, सुधीर दळवी, किसान गायकवाड, जमीर सय्यद, मधुकर चौगुले, बिकन सोनार, राजू अवताडे, असफकली सिस्टिया, शशिकांत लोखंडे, वसंत तरटे, रवींद्र नुले, मेहबूब अली सय्यद, साहेबराब राठोड, लक्ष्मण टेंभरे, विष्णू गोसावी, प्रदीप जांबळे, चंद्रकांत पाटील, भानुदास जाधव, नितीन मालप, रमेश बाबुराव बिराडे.