मुंबई - कोरोनाचा संसर्ग थांबविण्यासाठी रस्त्यावर २४ तास पहारा देणाऱ्या राज्य पोलीस दलासाठी चिंताजनक बाब समोर येत आहे. राज्यात कोरोनाबाधित पोलिसांच्या संख्येत भर पडली असून राज्यात बाधित असेल्या ७० पोलिसांचा आतापर्यंत मृत्यू झाला असून यात ५ पोलीस अधिकारी, तर ६५ पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. राज्यात अजूनही १०७८ पोलिसांवर वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरू असून यात १२० पोलीस अधिकारी, तर ९५८ पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
लॉकडाऊन काळात कलम १८८ नुसार १ लाख ५१ हजार ३३३ गुन्हे दाखल झाले असून विलगीकरण मोडणाऱ्या ७८६ जणांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. राज्यात पोलिसांवर हल्ले होण्याचे २९४ गुन्हे घडले असून याप्रकरणी आतापर्यंत ८६१ आरोपींना अटक करण्यात आली आहे. कोविड संदर्भात पोलीस नियंत्रण कक्षावर एकूण १ लाख ५ हजार कॉल आले असून अनधिकृत वाहतूक प्रकरणी १३३५ गुन्हे नोंद करत २९६४० जणांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी तब्बल ८८३३० वाहन लॉकडाऊन दरम्यान जप्त केली असून तब्बल ११ कोटी २३ लाख १७ हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे. वैद्यकीय पथकावर हल्ले होण्याचे ५४ गुन्हे घडले असून तब्बल ८६ पोलीस आतापर्यंत जखमी झाले आहेत.
चिंताजनक! राज्यात आतापर्यंत कोरोनामुळे ७० पोलिसांचा मृत्यू
लॉकडाऊन काळात कलम १८८ नुसार १ लाख ५१ हजार ३३३ गुन्हे दाखल झाले असून विलगीकरण मोडणाऱ्या ७८६ जणांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. राज्यात पोलिसांवर हल्ले होण्याचे २९४ गुन्हे घडले असून याप्रकरणी आतापर्यंत ८६१ आरोपींना अटक करण्यात आली आहे.