मुंबई : मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या विशेष बाल पोलीस कक्षाला (SIPU)नागपाडा परिसरात लहान मुले बालकामगार म्हणून काम करत असल्याची माहिती कामगार आयुक्त कार्यालय आणि प्रथम या स्वयंसेवी संस्थेकडून प्राप्त झाल्यावर या माहितीची शहानिशा करून कारवाई करण्याचे ठरविण्यात आले आणि ६ नेपाळी बालकामगारांसह एकूण ७ बालकांची बालकामगारितून मुक्तता (children Freedom from child labour) केली आहे. या प्रकरणी नागपाडा पोलीस ठाण्यात कलम ७५, ७९ बाल न्याय (काळजी व संरक्षण) अधिनियम २०१५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बालकांची बालकामगारितून मुक्तता : विशेष बाल पोलीस कक्षाने (SIPU) सरकारी कामगार अधिकारी आणि स्वंयसेवी संस्था यांच्या मदतीने ४ जानेवारीला अंदाजे १.१० वाजताच्या सुमारास के मामसा इस्टेट, मदनपुरा, नागपाडा येथील एकूण तीन आस्थापनांवर छापा टाकून कारवाई करण्यात आली. या आस्थापनेमध्ये बॅग बनविण्यासाठी रेझीन कटींग करण्याचे काम करत असलेल्या एकूण सात बालकांची बालकामगारितून मुक्तता करण्यात आली.
आस्थापनेच्या मालकाला अटक : पहिल्या कारवाईत पोटमाळ्यावर असलेल्या पहिल्या मजल्यावर जमशेद बॅग कारखाना येथे छापा टाकून एका अल्पवयीन बालकाची बालकामगारितून मुक्तता करण्यात आली. दुसऱ्या कारवाई दरम्यान पोट माळ्यावर असलेल्या दुसऱ्या मजल्यावर छापा टाकून एकूण ३ अल्पवयीन बालकांची बालकामगारितून मुक्तता करण्यात आली. तसेच आस्थापनेच्या मालकाला अटक करण्यात आली. या अटक केलेल्या आरोपीचं नाव जमशेद अब्दुल शेख, वय ३९ आहे. तसेच आफताब बँक कारखाना, उमर मजीद जवळ, मदनपुरा, नागपाडा या आस्थापनेत कारवाई करून एकूण ३ अल्पवयीन बालकांची बालकामगारितून मुक्तता करण्यात आली. या आस्थापनेचा मालक नामे मोहम्मद अफताब नूर मोहम्मद अन्सारी, वय २८वर्षे यास अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी नागपाडा पोलीस ठाण्यात कलम ७५, ७९ बाल न्याय (काळजी व संरक्षण) अधिनियम २०१५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
6 मुले नेपाळमधील : या कारवाईमध्ये एकूण सात बालकांची बालकामगारितून मुक्तता करण्यात आली असून मुक्त केलेल्या मुलांपैकी ६ मुले ही नेपाळ (Nepali child labourers) देशातील आहेत. सर्व मुलांना बाल कल्याण समिती समक्ष हजर करण्यात येवून त्यांना काळजी व संरक्षणकामी मांटुगा बालगृह येथे ठेवण्यात आले आहे. या कारवाईत २ आस्थापनेच्या मालकास अटक करण्यात आली.