मुंबई - मुंबईत मार्चपासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सुरू झाला. ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढली होती. 16 नोव्हेंबरला रुग्ण संख्या 409 पर्यंत खाली आली होती. आज (रविवारी) मुंबईत 656 नवे रुग्ण आढळून आले असून, 6 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, आज 1 हजार 145 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.
7 हजार 180 सक्रिय रुग्ण -
मुंबईत आज कोरोनाचे 656 नवे रुग्ण आढळून आले असून, 6 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मुंबईमधील कोरोनाग्रस्तांचा आकडा 2 लाख 98 हजार 889 वर पोहोचला आहे. तर, मृतांचा आकडा 11 हजार 186 वर पोहोचला आहे. मुंबईमधून आज 1 हजार 145 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. मुंबईत डिस्चार्ज देण्यात आलेल्यांचा आकडा 2 लाख 79 हजार 643 वर गेला आहे. सध्या मुंबईत 7 हजार 180 सक्रिय रुग्ण आहेत.
रुग्ण दुप्पटीचा कालावधी 366 दिवसांवर -
मुंबईत कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 93 टक्क्यांवर पोहोचले आहे. रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 366 दिवस, तर सरासरी दर 0.21 टक्के आहे. मुंबईत सध्या कोरोनाचे रुग्ण आढळून आलेल्या 178 चाळी आणि झोपडपट्टी कंटेन्मेंट झोन घोषित करून सील करण्यात आल्या आहेत. तसेच, 2 हजार 476 इमारती व इमारतींच्या विंग, काही मजले सील करण्यात आले आहेत. तर, कोरोनाचे निदान करण्यासाठी 24 लाख 95 हजार 560 चाचण्या करण्यात आल्या आहेत.
कमी नोंद झालेली रुग्णसंख्या -
7 नोव्हेंबर - 576 रुग्ण
2 नोव्हेंबर - 706 रुग्ण
3 नोव्हेंबर - 746 रुग्ण
6 नोव्हेंबर - 792 रुग्ण
9 नोव्हेंबर - 599 रुग्ण
10 नोव्हेंबर - 535 रुग्ण
14 नोव्हेंबर - 574 रुग्ण
16 नोव्हेंबर - 409 रुग्ण
हेही वाचा - मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत कोस्टल रोडच्या पहिल्या बोगद्याच्या खोदकामाला उद्यापासून सुरुवात