ETV Bharat / state

64वा वार्षिक रेल्वे राष्ट्रीय पुरस्कार संपन्न; रेल्वेत उल्लेखनीय कामगिरी बजावलेल्यांचा गौरव - piyush goyal

नरिमन पॉईंट येथील एनसीपीएच्या जमशेदजी भाभा थिएटरमध्ये  रेल्वेचा वार्षिक 64 वा रेल्वे राष्ट्रीय पुरस्कार समारंभात पार पडला. यात भारतीय रेल्वेत विविध उल्लेखनीय कामगिरी बजावलेल्या 133 रेल्वेच्या कर्मचाऱ्यांना  गौरविण्यात आले.

64वा वार्षिक रेल्वे राष्ट्रीय पुरस्कार संपन्न
author img

By

Published : Jul 31, 2019, 11:48 AM IST

मुंबई- येथील नरिमन पॉईंट येथील एनसीपीएच्या जमशेदजी भाभा थिएटरमध्ये रेल्वेचा 64 वा वार्षिक रेल्वे राष्ट्रीय पुरस्कार समारंभ पार पडला. यात भारतीय रेल्वेत विविध उल्लेखनीय कामगिरी बजावलेल्या 133 रेल्वेच्या कर्मचाऱ्यांना गौरविण्यात आले. या सोहळ्याला रेल्वेच्या विविध विभागातून कर्मचारी आले होते.

64वा वार्षिक रेल्वे राष्ट्रीय पुरस्कार संपन्न
या कार्यक्रमाला रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष व्ही. के. यादव प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी 133 रेल्वे कर्मचाऱ्यांना पदक, धनादेश व प्रमाणपत्र यादव यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. यातील 8 कर्मचारी हे मध्य रेल्वेचे आहेत. भारतीय रेल्वेच्या झोन आणि उत्पादनाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या कर्मचारी आणि अधिकारी यांना 20 शिल्ड्स प्रदान केरण्यात आले. रेल्वेने गेल्या वर्षी केलेल्या कामांचे संसदेत बजेट चर्चे दरम्यान माननीय संसद सदस्यांनी कौतुक केले होते. रेल्वे कोचच्या विक्रमी वाढीमुळे लोकांच्या अपेक्षा अनेक पटींनी वाढल्या ते पूर्ण करण्याचे आव्हान रेल्वेसमोर असल्याचे रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष व्ही.के. यादव यांनी यावेळी म्हटले. रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे विजेत्यांचे अभिनंदन केले. तसेच महालक्ष्मी एक्सप्रेसच्या घटनेवेळी राज्य सरकार व त्यांच्या टीम व संबंधित यंत्रणांनी उल्लेखनीय कामगिरी केली होती. या सर्वांनी मिळून एक कुटुंब म्हणून काम केल्याचे गौरद्वगार गोयल यांनी काढले. येत्या 12 वर्षात भारतीय रेल्वेत 50 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार असल्याचेही गोयल यांनी यावेळी म्हटले.

Intro:भारतीय रेल्वेत विविध उल्लेखनीय कामगिरी बजावलेल्या 133 रेल्वेच्या कर्मचाऱ्यांना आज रेल्वेच्या वार्षिक 64 व्या रेल्वे राष्ट्रीय पुरस्कार समारंभात गौरविण्यात आले. या सोहळ्याला भारतातील रेल्वेच्या विविध विभागातून कर्मचारी आले होते.

Body:नरिमन पॉईंट येथील एनसीपीएच्या जमशेदजी भाभा थिएटरमध्ये हा सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष व्ही.के.यादव प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
133 रेल्वे कर्मचाऱ्यांना पदक, धनादेश व प्रमाणपत्र रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष व्ही.के.यादव यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. यातील 8 कर्मचारी हे मध्य रेल्वेचे आहेत. भारतीय रेल्वेच्या झोन आणि उत्पादनाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या कर्मचारी व अधिकारी यांना 20 शिल्ड्स प्रदान केल्या.

Conclusion:रेल्वेने गेल्या वर्षी केलेल्या कामांचे संसदेत बजेट चर्चे दरम्यान माननीय संसद सदस्यांनी कौतुक केले. रेल्वे कोचच्या विक्रमी वाढीमुळे लोकांच्या अपेक्षा अनेक पटींनी वाढल्या ते पूर्ण करण्याचे आव्हान रेल्वेसमोर असल्याचे रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष व्ही.के. यादव यांनी यावेळी म्हटले.
रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे विजेत्यांचे अभिनंदन केले. तसेच महालक्ष्मी एक्सप्रेसच्या घटनेवेळी राज्य सरकार व त्यांच्या टीम व संबंधित यंत्रणांनी उल्लेखनीय कामगिरी केली, सर्वांनी मिळून एक कुटुंब म्हणून काम केल्याचे गौरद्वगार गोयल यांनी काढले. येत्या 12 वर्षात भारतीय रेल्वेत 50 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार असल्याचेही गोयल यांनी यावेळी म्हटले.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.