मुंबई - राज्यात मागील 24 तासांत नव्या 6 हजार 397 कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. तर 30 बाधितांचा मृत्यू झाला, अशी माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली. दरम्यान, सलग पाच दिवस राज्यातील रुग्णसंख्या 8 हजारांच्या घरात होती. मात्र, सहाव्या दिवशी आज (सोमवारी) ही रुग्णसंख्या कमी झाली आहे.
राज्यातील 24 तासांतील कोरोनास्थिती -
राज्यात 24 तासांत 5,754 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत राज्यात कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 20 लाख 30 हजार 458 झाली. राज्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 93.94 टक्क्यांवर पोहोचले आहे. तर राज्यातील मृत्यूदराचे प्रमाण 2.41% इतके आहे. आज 6 हजार 397 रुग्णांची नोंद झाली आहे. यामुळे राज्यातील एकूण बाधितांची संख्या 21 लाख 61 हजार 467 इतकी झाली आहे. सध्या राज्यात 3 लाख 43 हजार 947 जण होमक्वारांटाईनमध्ये आहेत. तर सक्रिय रुग्णांची संख्या 77 हजार 618 आहे.
हेही वाचा - Corona Bulletin : राज्यातील कोरोनासंदर्भातील घडामोडींचा वेगवान आढावा
कोणत्या भागात सर्वाधिक रुग्ण ?
- मुंबई महानगरपालिका क्षेत्र- 855
- ठाणे मनपा क्षेत्र - 140
- नवी मुंबई मनपा क्षेत्र - 157
- कल्याण डोंबवली मनपा क्षेत्र- 180
- पनवेल मनपा क्षेत्र - 107
- नाशिक मनपा क्षेत्र - 136
- अहमदनगर- 147
- जळगाव - 138
- जळगाव मनपा क्षेत्र - 104
- पुणे - 209
- पुणे मनपा क्षेत्र - 427
- पिंपरी चिंचवड मनपा क्षेत्र- 242
- सातारा - 193
- औरंगाबाद मनपा क्षेत्र - 190
- नांदेड मनपा क्षेत्र - 101
- अकोला- 128
- अकोला मनपा क्षेत्र - 189
- अमरावती मनपा क्षेत्र - 346
- नागपूर मनपा क्षेत्र- 728
- नागपूर - 171