मुंबई - देशभरात 16 जानेवारीपासून कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली. को-विन अॅपमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे लसीकरण स्थगित करण्यात आली होती. 19 जानेवारीपासून पुन्हा लसीकरणाला सुरुवात झाली. मुंबईत आज 12 लसीकरण केंद्रांवर 80 बूथवर 6 हजार 387 आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली असून 8 जणांवर सौम्य दुष्परिणाम जाणवून आले. आतापर्यंत 53 हजार 784 आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली आहे.
आज झालेले लसीकरण -
मुंबईत आज 8 हजार लसीकरणाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. महापालिकेच्या 11 तर राज्य सरकारच्या 1 अशा एकूण 12 लसीकरण केंद्रांमधील 80 बूथवर 6 हजार 387 आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली. मुंबईत आज एकूण उद्दिष्टापेक्षा 80 टक्के लसीकरण करण्यात आरोग्य विभागाला यश आले. त्यात परळ येथील केईएम रुग्णालयात 640, सायन येथील टिळक रुग्णालय 320, विलेपार्ले येथील कूपर हॉस्पिटल 627, मुंबई सेंट्रल येथील नायर रुग्णालय 865, सांताक्रूझ येथील व्ही. एन. देसाई रुग्णालय 95, कांदिवली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय 958, घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालय 1119, बिकेसी येथील जंबो हॉस्पिटल 700, बांद्रा भाभा हॉस्पिटल 294, भायखळा येथील राज्य सरकारच्या जेजे हॉस्पिटल 52, सेव्हन हिल 298, गोरेगाव नेस्को 419 आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली.
आतापर्यंत 53 हजार 784 लसीकरण -
16 जानेवारीपासून आतापार्यंत 53 हजार 784 आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली. त्यात परळ येथील केईएम रुग्णालयात 7 हजार 102, सायन येथील टिळक रुग्णालय 3 हजार 691, विलेपार्ले येथील कूपर हॉस्पिटल 5 हजार 516, मुंबई सेंट्रल येथील नायर रुग्णालय 6 हजार 449, सांताक्रूझ येथील व्ही. एन. देसाई रुग्णालय 1 हजार 254, कांदिवली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय 8 हजार 246, घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालय 8 हजार 148, बिकेसी येथील जंबो हॉस्पिटल 5 हजार 766, बांद्रा भाभा हॉस्पिटल 3 हजार 447, भायखळा येथील राज्य सरकारच्या जेजे हॉस्पिटल 385, सेव्हन हिल 2 हजार 238, गोरेगाव नेस्को 1 हजार 542 आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली.
हेही वाचा - मोदी शेतकऱ्यांसोबत युद्ध लढणार आहेत का? नवाब मलिक यांचा प्रश्न
हेही वाचा - देशी पिस्तुलासह बिल्डरला अटक, सात जिवंत काडतूस हस्तगत