ETV Bharat / state

Mumbai Corona Update : मुंबईत ६ लाख ६३ हजार रुग्ण होम क्वारंटाईन - Mumbai Corona Patients Home Quarantine

मुंबईमधील होम क्वारंटाईन रुग्णांचा आकडा ६ लाख ६३ हजारांवर गेला आहे. ( Mumbai Quaratine Patients ) जे रुग्ण रोज आढळून येत आहेत त्यापैकी ९० टक्के रुग्णांना लक्षणे नाहीत. ५ टक्के रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याची तर १ टक्के रुग्णांना आयसीयू बेडची आवश्यकता भासत आहे. ( Mumbai Corona Patients )

Mumbai Corona Update
मुंबई कोरोना अपडेट
author img

By

Published : Jan 10, 2022, 8:43 PM IST

Updated : Jan 10, 2022, 8:52 PM IST

मुंबई - मुंबईमध्ये डिसेंबरपासून पुन्हा कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. ( Corona Patients Increasing in Mumbai ) तिसऱ्या लाटेत आढळून येणारे बहुसंख्य रुग्ण घरातच उपचार घेऊन बरे होत असल्याने लक्षणे नसलेल्या आणि सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना होम क्वारंटाईन केले जात आहे. ( Corona Patients Quarantine at Home ) यामुळे महिनाभरात होम क्वारंटाईन रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. मुंबईमधील होम क्वारंटाईन रुग्णांचा आकडा ६ लाख ६३ हजारांवर गेला आहे.

९० टक्के रुग्णांना लक्षणे नाहीत -

मुंबईमध्ये डिसेंबर महिन्यापासून कोरोनाची तिसरी लाट आली आहे. गेल्या महिनाभरात रुग्णसंख्या वाढून तीन दिवस २० हजारावर रुग्ण आढळून आले. त्यात काल रविवारी किंचित घाट होऊन १९ हजारावर रुग्ण आढळून आले आहेत. रोज २० हजाराच्या सुमारास रुग्ण आढळून येत असल्याने सक्रिय रुग्णांची संख्या १ लाखावर गेली आहे. जे रुग्ण रोज आढळून येत आहेत त्यापैकी ९० टक्के रुग्णांना लक्षणे नाहीत. ५ टक्के रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याची तर १ टक्के रुग्णांना आयसीयू बेडची आवश्यकता भासत आहे. यामुळे मुंबईमध्ये आढळून येणाऱ्या रुग्णांना आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांना होम क्वारंटाईन केले जात आहे.

६ लाख ६३ हजार ५१ लोक होम क्वारंटाईन -

मुंबईमध्ये सध्या कोरोनाचा संसंर्ग झालेले रुग्ण आणि त्यांच्या संपर्कात आलेले असे ६ लाख ६३ हजार ५१ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. ५४२ रुग्ण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. आतापर्यंत एकूण १ लाख ५७ हजार ३८८ रुग्णांना संस्थात्मक क्वारंटाईन सेंटरमध्ये पाठवण्यात आले आहे. तर आतापर्यंत एकूण ९० लाख २ हजार ७८२ लोकांनी होम क्वारंटाईनचा कालावधी पूर्ण केला आहे. कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेल्या एकूण ९६ लाख ६६ हजार ३७५ लोकांचा पालिकेने शोध घेतला आहे. त्यापैकी ५५ लाख ६९ हजार ५९ म्हणजेच ५८ टक्के हाय रिक्स संपर्क आहेत. तर ४० लाख ९७ हजार ३१६ म्हणजेच ४२ टक्के लो रिस्क आहेत.

घरीच राहून रुग्ण बरे -

मुंबईमध्ये कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे. तरीही रुग्णालयात भरती न होता घरी राहून रुग्ण बरे होत आहेत. घरीच राहून रुग्ण बरे होत असल्याने लक्षणे नसलेले व सौम्य लक्षणे असलेल्या पॉजिटीव्ह रुग्णांना होम क्वारंटाईन केले जात आहे. यामुळे हा आकडा मोठा दिसत आहे. होम क्वारंटाईन आणि आढळून येणाऱ्या रुग्णांचा आकडा मोठा दिसत असला तरी ४ ते ५ दिवसात रुग्ण बरे होत आहेत, अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.

हेही वाचा - Mumbai Mayor On Corona : मुंबई डेंजर झोनच्या बाहेर, मात्र काळजी घ्या - किशोरी पेडणेकर

१ लाख १७ हजार ४३७ सक्रिय रुग्ण -

मुंबईत काल रविवारी ९ जानेवारीला १९ हजार ४७४ नवे रुग्ण आढळून आले आहेत. ७ मृत्यूची नोंद झाली आहे. ८ हजार ६३ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. यामुळे आतापर्यंत एकूण ९ लाख १४ हजार ५७२ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी ७ लाख ७८ हजार ११९ रुग्ण बरे झाले आहेत. तर १६ हजार ४०६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सक्रिय रुग्णांची संख्या १ लाख १७ हजार ४३७ वर पोहोचली ( Active Corona Patients in Mumbai ) आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८५ टक्के तर रुग्ण दुपटीचा कालावधी ४१ दिवस इतका आहे. मुंबईमधील १२३ इमारती आणि १७ झोपडपट्ट्या सील करण्यात आली आहे. २ जानेवारी ते ८ जानेवारी या कालावधीत कोरोना वाढीचा दर १.६६ टक्के इतका आहे.

७८.७ टक्के बेड रिक्त -

मुंबईत काल रविवारी आढळून आलेल्या १९ हजार ४७४ रुग्णांपैकी १५ हजार ९६९ म्हणजेच ८२ टक्के लक्षणे नसलेले रुग्ण आहेत. आज १ हजार २४० रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागले. ११८ रुग्णांना ऑक्सिजन बेडची आवश्यकता भासली आहे. मुंबईत रुग्णालयांमध्ये ३४ हजार ९६० बेड्स असून त्यापैकी ७ हजार ४३२ बेडवर म्हणजेच २१.३ टक्के बेडवर रुग्ण आहेत. इतर ७८.७ टक्के बेड रिक्त आहेत.

अशी वाढली रुग्णसंख्या -

मुंबईत गेल्या वर्षी मार्च महिन्यात कोरोना विषाणूचा पहिला रुग्ण आढळून आला. तेव्हापासून मुंबईत कोरोनाचा प्रसार आहे. फेब्रुवारी महिन्यात दुसरी लाट आली. एप्रिल महिन्यात रुग्णसंख्या ११ हजारांवर गेली होती. जूनपासून त्यात घट होऊ लागली. १ डिसेंबरला कोरोनाचे १०८ नवे रुग्ण आढळून आले होते. २ डिसेंबरला त्यात वाढ होऊन २२८ रुग्ण आढळून आले. १७ डिसेंबरला २९५, १९ डिसेंबरला ३३६, २२ डिसेंबरला ४९०, २३ डिसेंबरला ६०२, २४ डिसेंबरला ६८३, २५ डिसेंबर ७५७, २६ डिसेंबर ९२२, २७ डिसेंबरला ८०९, २८ डिसेंबरला १ हजार ३७७, २९ डिसेंबरला २ हजार ५१०, ३० डिसेंबर ३ हजार ६७१, ३१ डिसेंबरला ५ हजार ६३१, १ जानेवारीला ६ हजार ३४७, २ जानेवारीला ८ हजार ६३, ३ जानेवारीला ८ हजार ८२, ४ जानेवारीला १० हजार ८६०, ५ जानेवारीला १५ हजार १६६, ६ जानेवारीला २० हजार १८१, ७ जानेवारीला २० हजार ९७१, ८ जानेवारीला २० हजार ३१८, ९ जानेवारीला १९ हजार ४७४ नवीन रुग्ण आढळून आले आहेत.

नऊ वेळा शून्य मृत्यूची नोंद -

मुंबईमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर गेल्या काही महिन्यात १ ते ६ मृत्यूंची नोंद झाली होती. १७ ऑक्टोंबर २०२१ रोजी शून्य मृत्यूची नोंद झालेली आहे. त्यानंतर ११ डिसेंबर, १५ डिसेंबर, १८ डिसेंबर, २० डिसेंबर, २२ डिसेंबर, २५ डिसेंबर, ३० डिसेंबरला, २ जानेवारीला शून्य मृत्यूची नोंद झाली आहे.

Last Updated : Jan 10, 2022, 8:52 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.