ETV Bharat / state

58 कोटी किमतीच्या अमली पदार्थ प्रकरणी 13 जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल - अमली पदार्थ प्रकरण मुंबई

इतक्या मोठ्या प्रमाणात एमडीसारखा अमली पदार्थ विकून या आरोपींनी मोठ्या प्रमाणात पैसा कमावला होता. या 13 आरोपींच्या 15 बँक खात्यांतून तब्बल 1 कोटी 55 लाख 19 हजार रुपये पोलिसांनी हस्तगत केले आहेत. शिवाय, त्यांच्याकडील तीन वाहने देखील पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत.

drug
अमली पदार्थ
author img

By

Published : Nov 27, 2020, 4:08 PM IST

Updated : Nov 27, 2020, 5:01 PM IST

मुंबई - दहशतवादविरोधी पथकाच्या मुंबई युनिट केलेल्या कारवाईदरम्यान तब्बल 58 कोटी 55 लाख 72 हजार रुपये किमतीचे 146 किलो एमडी (मेफेड्रॉन) अमली पदार्थ जप्त करण्यात आले होते. या गुन्ह्यात तब्बल 13 जणांना अटक करण्यात आली होती. यानंतर आता सफेमाअंतर्गत (Smugglers & Foreign Exchange Manipulators Act) आरोपींची संपत्ती गोठवण्यात आलेली आहे. तसेच दहशतवादविरोधी पथक मुंबईकडून या आरोपींच्या विरोधात सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

आरोपींच्या मालकीची संपत्ती जप्त -

इतक्या मोठ्या प्रमाणात एमडीसारखा अमली पदार्थ विकून या आरोपींनी मोठ्या प्रमाणात पैसा कमावला होता. या 13 आरोपींच्या 15 बँक खात्यांतून तब्बल 1 कोटी 55 लाख 19 हजार रुपये पोलिसांनी हस्तगत केले आहेत. तसेच गुन्ह्यात वापरलेली तीन वाहनेही ताब्यात घेण्यात आलेली आहेत.

या आरोपींच्या संपत्ती झाल्या जप्त -

या गुन्ह्यातील आरोपी सरदार पाटील याच्या सांगली जिल्ह्यातील शिराळा येथील एमआयडीसीमधील 3195 चौरस मीटरचा प्लॉट जप्त करण्यात आलेला आहे. या प्रकरणातील आणखी एक आरोपी केस कुरेश सिद्दिकी याने पनवेल येथे आकुर्ली रोड जवळ विकत घेतलेला 35 लाख रुपयांचा फ्लॅटही जप्त केलेला आहे. तसेच या टोळीतील आणखी एक आरोपी जो दाऊदशी संबंधित आहे, मोहम्मद तनवीर अब्दुल अजीज परयाणी याच्याकडून 1132 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, 71 ग्रॅम चांदीचे दागिने, असा 41 लाख 32 हजार ऐवज आणि 3 लाखांची विदेशी बनावटीची घड्याळे, दिऱ्हाम, अमेरिकन डॉलर जप्त करण्यात आले आहे.

आरोपपत्र दाखल -

आरोपींच्या जप्त करण्यात आलेल्या संपत्तीचे विश्लेषण करून त्याबद्दल सफेमा कायद्याखालीं योग्य ती परवानगी घेत सदरची संपत्ती गोठवण्यात आलेली आहे. दहशतवाद विरोधी पथक मुंबईकडून या आरोपींच्या विरोधात सत्र न्यायालयात आरोपपत्र सुद्धा दाखल करण्यात आले आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे

  1. अब्दुल रज्जाक कादर शेख
  2. इरफान शेख सुलेमान जोहर शेख
  3. जितेंद्र शरद पवार
  4. नरेश मदन मस्कर
  5. सरदार उत्तम पाटील
  6. जुबेर लाल मोहम्मद
  7. मोहम्मद सलीम अब्दुल हमीद
  8. सुरेश सिद्दिकी
  9. आवेश अकबर खान
  10. मोहम्मद तनवीर अब्दुल
  11. मोहम्मद वसीम अब्दुल लतीफ शेख
  12. मुस्तफा जुल्फिकार चारणीया
  13. मोहमद अब्दुल परयांनी

Last Updated : Nov 27, 2020, 5:01 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.