मुंबई : मीरा-भाईंदरमध्ये एकीकडे कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असताना आज एकाच दिवशी मीरा-भाईंदरमधील तब्बल ५६ रुग्णांना डिस्चार्ज देऊन घरी सोडण्यात आले आहे. महाराष्ट्रातील एकाच दिवशी इतक्या रुग्णांना डिस्चार्ज देणारी ही पहिलीच महापालिका आहे. आज या रुग्णांना बऱ्याच दिवसांनी घरी परतताना त्यांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळाला.
मीरा भाईंदरमध्ये कोरोना रुग्णांचा आकडा 157 वर गेला होता. आज ५६ रुग्णांना डिस्चाज दिल्याने आता फक्त ५६ रुग्णांवर उपचार सुरू असून, याही रुग्णांचा आकडा शून्यावर नेण्याचा विश्वास महापालिका आयुक्तांनी व्यक्त केला आहे.
सुरुवातीला कोरोना रुग्णांसाठी जागा मिळणे अशक्य असताना मीरा-भाईंदरचे आमदार गीता जैन यांनी त्यांची इमारत रुग्णांच्या उपचारासाठी खुली करून दिली होती. तसेच त्यांनी पंडित भीमसेन जोशी रुग्णालयासाठी विशेष निधी मिळवून दिला.