ETV Bharat / state

Omicron in Maharashtra : आज ओमायक्रॉनचा एकही नवा रुग्ण नाही - omicron patients

राज्यात आज आज (दि. 20) दिवसभरात ( Omicron in Maharashtra ) एकही ओमायक्रॉनचा नवा रुग्ण सापडला नाही. कोरोना रुग्णांची संख्येतही कमालीची घट झाली आहे. दिवसभरात 544 नव्या कोरोनाग्रस्तांची निदान ( Corona In Maharashtra ) झाले असून 4 रुग्ण दगवल्याची आहे. राज्यात सध्या 7 हजार 68 रुग्ण सक्रिय रुग्ण आहेत.

ओमायक्रॉन
ओमायक्रॉन
author img

By

Published : Dec 20, 2021, 9:03 PM IST

मुंबई - परदेशात धडकी भरवणाऱ्या ओमायक्रॉनने ( Omicron in Maharashtra ) महाराष्ट्राला धास्तीतून दिलासा दिला आहे. आज (दि. 20) दिवसभरात ओमायक्रॉनचा एकही नवा रुग्ण सापडला नाही. कोरोना रुग्णांची संख्येतही कमालीची घट झाली आहे. दिवसभरात 544 नव्या कोरोनाग्रस्तांची निदान ( Corona In Maharashtra ) झाले असून 4 रुग्ण दगवल्याची माहिती राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली आहे.

7 हजार 68 रुग्ण कोरोना सक्रिय रुग्ण

राज्यात ओमायक्रॉन संसर्गाचा प्रादुर्भाव कासवाच्या गतीने वाढत आहे. नव्या विषाणूचा बीमोड करण्यासाठी राज्याच्या आरोग्य विभागाने कंबर कसली आहे. राज्यात लसीकरण आणि चाचण्यांवर भर दिला आहे. आजपर्यंत 6 कोटी 77 लाख 71 हजार 676 चाचण्या केल्या. सुमारे 66 लाख 50 हजार 140 रुग्णांच्या चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत. यात 544 नव्या रुग्णांचा समावेश आहे. तर 515 रुग्ण बरं होऊन घरी परतले आहेत. बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या 64 लाख 98 हजार 15 इतकी आहे. रुग्ण बरे होण्याचा सरासरी दरही स्थितस्थावर म्हणजेच 97.71 टक्के इतका आहे. तर मृत्यूदर 2.12 टक्के आहे. राज्यात आतापर्यंत 7 हजार 68 रुग्ण सक्रिय असून 81 हजार 661 व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

ओमायक्रॉनचा दिलासा

राष्ट्रीय विज्ञान संस्थेने ( National Institute of Science ) ओमायक्रॉनबाबत दिलेल्या अहवालानुसार आतापर्यंत 54 रुग्ण सापडले आहेत. आज दिवसभरात एकही नवीन रुग्ण सापडला नाही. राज्याला यामुळे दिलासा मिळाला आहे. शिवाय ओमायक्रॉनची रुग्ण संख्या स्थिरस्थावर म्हणजे 54 इतकी आहे. त्यामध्ये 31 जणांची आरटीपीआर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर घरी सोडून देण्यात आले आहे.

ओमायक्रॉनग्रस्त रुग्णांची आकडेवारी

मुंबई22
पिंपरी चिंचवड 11
पुणे ग्रामीण7
पुणे महापालिका3
सातारा3
कल्याण-डोंबिवली2
उस्मानाबाद2
नागपूर1
लातूर1
वसई-विरार1
बुलडाणा 1
एकूण54

525 प्रवाशांची जनुकीय चाचणी

1 डिसेंबरपासून आजपर्यंत 1 लाख 36 हजार 400 प्रवासी मुंबई, नागपूर आणि पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले. एकूण 23 हजार 15 प्रवाशांची आरटीपीआर चाचणी ( RT-PCR Test ) करण्यात आली. अति जोखमीच्या देशातील 86 आणि इतर देशातील 29 अशा एकूण 115 तर आजपर्यंतच्या 575 प्रवाशांची जनुकीय चाचणी करण्यासाठी नमुने पाठवले आहेत. त्यापैकी 81 नमुन्यांचा अहवाल प्रलंबित आहे, असे राज्य सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आकडेवारीवरून स्पष्ट होते.

'या' विभागात सर्वाधिक कोरोनाग्रस्त रुग्ण -

मुंबई महापालिका - 191

ठाणे - 06

ठाणे मनपा - 23

नवी मुंबई पालिका - 24

कल्याण डोबिवली पालिका - 15

वसई विरार पालिका - 14

नाशिक - 22

नाशिक पालिका - 12

अहमदनगर - 50

पुणे - 26

पुणे पालिका - 34

पिंपरी चिंचवड पालिका - 33

हे ही वाचा - BJP vs Shivsena : हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून शिवसेना पुन्हा भाजपच्या निशाण्यावर

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.