मुंबई - राज्य दहशतवादी पथकाकडून करण्यात आलेल्या कारवाई दरम्यान मुंबईतील विक्रोळी परिसरातून 2 व्यक्तींना एमडी अंमली पदार्थांसह अटक करण्यात आली आहे. या आरोपींच्या केलेल्या चौकशीमध्ये आणखी 3 आरोपींची नावे समोर आली आहेत.
हेही वाचा - आदित्य ठाकरे मुख्यमंत्री पदाचे दावेदार, पक्षाकडून होतेय मोर्चेबांधणी
या प्रकरणी अब्दुल रजाक कादर शेख (41) , इरफान बदर शेख (43) , सलमान शेख (28) , नरेश मसकर (45) , जितेंद्र परमार (45) या आरोपींना अटक करण्यात आली आहे.
राज्यात प्रतिबंधित असलेले एमडी नावाचे अंमली पदार्थ विकले जात असल्याची गुप्त माहिती एटीएसच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार केलेल्या कारवाईदरम्यान 5 आरोपींकडून 129 किलो अंमली पदार्थ जप्त करण्यात आले. जप्त करण्यात आलेल्या अंमली पदार्थाची आंतरराष्ट्रीय बाजारात प्रति किलो 40 लाख रुपये किंमत आहे. पोलिसांनी जप्त केलेल्या अंमली पदार्थाची एकूण किंमत 52 कोटी 64 लाख 94 हजार इतकी आहे.
हेही वाचा - 'ना फेरीवाला क्षेत्रा'वर फेरीवाल्यांचे पुन्हा अतिक्रमण; नागरिक त्रस्त
एटीएसच्या तपासात समोर आले आहे की, अत्याधुनिक तंत्रज्ञान व उच्च दर्जाच्या रसायनांचा वापर करून एमडीसारखे अंमली पदार्थ बनवण्यात येत आहेत. त्यामुळे ज्या ठिकाणी हे अंमली पदार्थ बनवले जात आहेत, त्या फॅक्टरीचा शोध घेण्याचा पोलीस प्रयत्न करत आहेत.