ETV Bharat / state

कोरोना अपडेट : पोलीस खात्यात 50 टक्के उपस्थिती, वर्क फ्रॉम होम सुरू

महाराष्ट्र पोलीस खात्यातील कार्यालयात गट-अ व गट-ब संवर्गातील अधिकाऱ्यांची उपस्थिती ही 100 टक्के ठेवण्यात येणार आहे. मात्र, गट क व ड संवर्गातील कर्मचाऱ्यांची कार्यालयातील उपस्थिती एकूण पद संख्येच्या पन्नास टक्के राहील, असे आदेश देण्यात आलेले आहे.

author img

By

Published : Feb 24, 2021, 2:55 PM IST

Updated : Feb 24, 2021, 7:00 PM IST

maharashtra police
महाराष्ट्र पोलीस

मुंबई - देशाची आर्थिक राजधानी मुंबई शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव आणखी वाढला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी येत्या आठ दिवसांमध्ये राज्यात लॉकडाऊन घोषित करावा की नाही, याचा निर्णय घेतला जाईल, असा इशारा दिला आहे. त्याला अनुसरून प्रशासकीय स्तरावरसुद्धा काम केले जात आहे. राज्य कर्मचाऱ्यांना 50% उपस्थितीत काम करायचे आणि वर्क फ्रॉम होम करण्याचे नियोजन करावे, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले होते. त्यानुसार पोलीस महासंचालक कार्यलयाकडून काढण्यात आलेल्या पत्रकानुसार पोलीस खात्यात आता 50 टक्के उपस्थितीसह वर्क फ्रॉम होम सुरू करण्यात आले आहे.

letter issued by DGP of maharashtra
पोलीस महासंचालकांच्या कार्यालयाने काढलेले परिपत्रक.

100 टक्के अधिकारी उपस्थित राहणार, क व ड वर्गातील कर्मचारी वर्क फ्रॉम होम -

महाराष्ट्र पोलीस खात्यातील कार्यालयात गट-अ व गट-ब संवर्गातील अधिकाऱ्यांची उपस्थिती ही 100 टक्के ठेवण्यात येणार आहे. मात्र, गट क व ड संवर्गातील कर्मचाऱ्यांची कार्यालयातील उपस्थिती एकूण पद संख्येच्या पन्नास टक्के राहील, असे आदेश देण्यात आलेले आहे. यापैकी 25 टक्के कर्मचारी हे सकाळी 9 ते सायंकाळी 4 या कालावधीत कार्यालयात उपस्थित राहणार आहेत. तर 25 टक्के कर्मचारी हे सकाळी 11 ते सायंकाळी 5 या कालावधीत त्यांच्या कर्तव्यावर कार्यालयात हजर असतील, असे आदेश पोलीस महासंचालकांच्या कार्यालयातून देण्यात आलेले आहेत.

हेही वाचा - राज्यात लसीकरणाचा ओलांडला 10 लाखांचा टप्पा

Last Updated : Feb 24, 2021, 7:00 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.