ETV Bharat / state

राज्यात गेल्या २४ तासात ५ पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू, ३११ पोलिसांना लागण - maharashtra police corona Infection

कोरोनाचे संक्रमण थांबवण्यासाठी लॉकडाऊनची अंमलबजावणी करणाऱ्या महाराष्ट्र पोलीस खात्यात आतापर्यंत १९ हजार ३८५ पोलिसांना कोरोनाची बाधा झाली असून यामध्ये २ हजार १३१ पोलीस अधिकारी, तर १८ हजार २५५ पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

महाराष्ट्र पोलीस
महाराष्ट्र पोलीस
author img

By

Published : Sep 14, 2020, 4:37 PM IST

मुंबई- राज्यात गेल्या २४ तासात कोरोनामुळे ५ पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला असून एकूण ३११ पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झालेली आहे. कर्तव्य बजावत असताना राज्यात आतापर्यंत १९४ पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून यामध्ये १८ पोलीस अधिकारी, तसेच १७६ पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

कोरोनाचे संक्रमण थांबवण्यासाठी लॉकडाऊनची अंमलबजावणी करणाऱ्या महाराष्ट्र पोलीस खात्यात आतापर्यंत १९ हजार ३८५ पोलिसांना कोरोनाची बाधा झाली असून यामध्ये २ हजार १३१ पोलीस अधिकारी, तर १८ हजार २५५ पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. सध्या राज्यात ३ हजार ६७० पोलीस कर्मचारी हे कोरोनाग्रस्त असून ते उपचार घेत आहेत. यात ४७८ पोलीस अधिकारी, तर ३ हजार १९२ पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

आतापर्यंत राज्यात १५ हजार ५२१ पोलीस हे कोरोनातून पूर्णपणे बरे झाले असून यात १ हजार ६३५ पोलीस अधिकारी, तर १३ हजार ८८६ पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. दरम्यान, पोलिसांनी नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर देखील कारवाईचा बडगा उगारला आहे. कलम १८८ नुसार महाराष्ट्र पोलिसांनी २ लाख ५४ हजार २४९ गुन्हे दाखल केले असून राज्यभरात क्वारंटाईनचा नियम मोडणाऱ्या ८६० जणांवर कारवाई केली आहे. राज्यभरात ३५६ प्रकरणात पोलिसांवर हल्ला झाला असून याप्रकरणी ८९४ आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

राज्यात अनधिकृतपणे वाहतूक करणाऱ्यांविरोधात देखील कारवाई करण्यात आलेली आहे. यात आतापर्यंत ३४ हजार ७३४ आरोपींना अनधिकृत वाहतुकी प्रकरणी अटक करण्यात आली आहे. आतापर्यंत पोलिसांनी ९६ हजार १४९ वाहने जप्त केली असून, तब्बल २४ कोटी ९७ लाख ५१ हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे. राज्यात पोलिसांवर हल्ला होण्याच्या घटनांमध्ये ८९ पोलीस जखमी झाले आहेत. वैद्यकीय पथकावर हल्ला होण्याच्या ७३ घटना घडलेल्या आहेत.

हेही वाचा- मागण्या मान्य न झाल्यास काम बंद आंदोलन, आयएमएचा राज्य सरकारला 7 दिवसांचा अल्टीमेटम

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.