ETV Bharat / state

राज्यात ४ हजार ९३० नवीन कोरोना रुग्णांचे निदान, ९५ रुग्णांचा मृत्यू - corona vaccine in maharashtra

महाराष्ट्रात आज कोरोनाच्या ४९३० नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली.

महाराष्ट्र कोरोना अपडेट
महाराष्ट्र कोरोना अपडेट
author img

By

Published : Dec 1, 2020, 8:44 PM IST

मुंबई - आज राज्यात ४९३० नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले आहे. यामुळे कोरोनाग्रस्तांचा आकडा १८,२८,८२६ वर पोहचला आहे. राज्यात आज ९५ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. आतापर्यंत एकूण ४७,२४६ रुग्णांचा मृत्यू झाला असून सध्या राज्यातील मृत्यूदर २.५८ टक्के एवढा आहे. राज्यात आज एकूण ८९,०९८ अ‌ॅक्टिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

८९,०९८ अ‌ॅक्टिव्ह रुग्ण -

राज्यात आज ६,२९० रुग्ण बरे होऊन घरी गेले. आजपर्यंत एकूण १६,९१,४१२ कोरोना बाधित बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२.४९ टक्के एवढे झाले आहे. राज्यात आज ९५ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,०९,१५,६८३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १८,२८,८२६ नमुने म्हणजेच १६.७५ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

राज्यात ५,३८,०८४ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये तर ६,४२० व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज एकूण ८९,०९८ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

कधी किती रुग्ण आढळून आले -

राज्यात जून दरम्यान दिवसाला ५४०० रुग्ण आढळून येत होते. लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिल्यावर रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली. जुलैच्या शेवटच्या आठवड्यात ही रुग्णसंख्या १० हजार ५०० वर गेली होती. सप्टेंबरच्या सुरुवातीला रुग्णसंख्या २० हजार ४०० वर गेली होती. सप्टेंबर महिना संपताना रुग्णसंख्या २४ हजार ८०० वर गेली होती.

मात्र ही रुग्णसंख्या गेल्या काही दिवसात कमी होत आहे. राज्यात १२ ऑक्टोबरला ७०८९ रुग्ण, १३ ऑक्टोबरला ८५२२ रुग्ण आढळून आले होते. १९ ऑक्टोबरला ५९८४ रुग्णांची, २६ ऑक्टोबरला ३६४५, ७ नोव्हेंबरला ३,९५९, १० नोव्हेंबरला ३,७९१, १५ नोव्हेंबरला २,५४४, १६ नोव्हेंबरला २,५३५, १७ नोव्हेंबरला २,८४०, २० नोव्हेंबरला ५,६४०, तर २१ नोव्हेंबरला ५७६० रुग्ण आढळून आले आहेत.

हेही वाचा- 'संपूर्ण देशाचे लसीकरण करणार असल्याचे सरकार कधीही म्हणाले नाही'

हेही वाचा- हैदराबाद महानगरपालिका निवडणुकीचे मतदान पार पडले, चार डिसेंबरला निकाल

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.